सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचा हिंदी रिमेक देखील करण्यात आला आहे. बॉलिवूडमधील काही कलाकार दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहेत. पाहूयात अशा अभिनेत्री ज्या लवकरच दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री क्रिती सनॉन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.२०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षाकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
टॉलिवूडमधील बहूचर्चित चित्रपट ‘RRR’ मध्ये अभिनेत्री आलिया भट महत्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती ‘सीता’ ही भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच मणिरत्नम यांच्या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘बाहुबली’ नंतरचा हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील बिग बजेट चित्रपट असणार आहे.
दाक्षिणात्य चित्रपट ‘केजीएफला’ घवघवीत यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘केजीएफ चॅप्टर – १’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बॉलिवूडमझील प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन या चित्रपटामध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ‘स्टुडंट ऑफ द ईयर २’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. आता लवकरच अनन्या टॉलिवूडमधील चित्रपटामध्ये काम करणारल आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हसिन दिलरूबा’ या चित्रपटातील अभिनयामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जुम्मान्धी नंदम’ या तेलगू चित्रपटातून तापसीने अभियन क्षेत्रात पाऊल ठेवलं. तापसीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच तापसी ‘मिशन इम्पॉसिबल’ या तेगलू चित्रपटामध्ये दिसणार आहे.
बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री कियारा अडवाणी देखील लवकरच टॉलिवूडमधील चित्रपटामध्ये काम करणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here