मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे
मुंबई: राज्यातील कोविड संसर्ग (Covid 19 in Maharashtra)) मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे (3rd Level Lockdown Restrictions) निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई (Mumbai) , मुंबई उपनगर (Suburban) आणि ठाणे (Thane) या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (Disaster Management Authority) निर्बंधांबाबत ठरविणार आहे. अशा रीतीने हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.
Also Read: अनलॉकची नवी नियमावली जाहीर; हॉटेल चालकांना दिलासा नाहीच!
मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरवतील असं सांगण्यात आलं आहे. मुंबई लोकलचं जाळं हे मुंबई, उपनगर, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. त्यामुळे लोकल ट्रेनबद्दल नक्की काय निर्णय घेतला जाणार किंवा सर्वसामान्य नागरिकांना परवानगी मिळणार का याबाबतचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. लोकलमधून प्रवास करायला देण्याची मोठी मागणी आहे, पण आजच्या नियमावलीत याचा उल्लेख नाही. त्यामुळे हा निर्णयदेखील आपत्ती व्यवस्थापन विभागच घेईल असं स्पष्ट होत आहे.

Also Read: Maharashtra Lockdown: ११ जिल्ह्यांवर निर्बंधांची टांगती तलवार कायम
राज्यातील आवश्यक आणि अनावश्यक दुकाने (शॉपिंग मॉलसह) सर्वांसाठी सोमवार ते शुक्रवार रात्री 8 पर्यंत तर शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरू असतील. सर्व सार्वजनिक उद्याने आणि क्रीडांगणे व्यायामासाठी, वॉकिंग, जॉगिंससाठी खुली करण्यास परवानगी असेल. घरून काम (Work From Home) शक्य असेल तर त्यांना घरूनच काम करण्याची परवानगी द्यावी. मालवाहतूक पूर्ण क्षमेतेने चालू ठेवावी. सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स, प्रार्थनास्थळे बंदच राहतील. सर्व रेस्टॉरंट्स 50 टक्के आसन क्षमतेसह संध्याकाळी 4 पर्यंत खुली राहतील. पार्सल आणि टेक अवेसाठी आधीप्रमाणे परवानगी असेल.
Esakal