आजकाल फॅशनचा बोलबाला सगळीकडे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. जो तो फॅशन ट्रेंड्स फॉलो करतोय. पण फॅशन करताना काही गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे असते, जेणेकरून त्याचे कोणतेही साईड इफेक्ट होता कामा नये. त्यात पावसाळ्यात फॅशनची ताळमेळ असणे फार महत्वाचे आहे. जर असे होत नसेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकते. आजकाल टॅटू आणि पियर्सिंग करण्याची फॅशन वाढत आहे, तरुणांईंना त्यांच्या पसंतीच्या शरीराच्या भागावर टॅटू आणि पियर्सिंग करत आहेत. पण पावसाळ्यात ते करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्याचे कारण जाणून घ्या.

जर तुम्ही देखील या पावसाळ्यात टॅटू आणि पियर्सिंग करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. पावसाळ्यात ते करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
आजकाल टॅटू आणि पियर्सिंग करण्याची फॅशन वाढत आहे
शरीरावर परमनंट शाईने बनवलेल्या छोट्या-मोठ्या डिझाईन्सला टॅटू म्हणतात.
तरुणांईं त्यांच्या पसंतीच्या शरीराच्या भागावर टॅटू आणि पियर्सिंग करत आहेत
अनेकजण फॅशन म्हणून शरीरावर टॅटू काढत आहेत.
पावसाळ्यात त्याचा धोका आणखी वाढू शकतो.
चेहऱ्यावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर टोचून घातलेल्या पिनला पियर्सिंग म्हणतात. हे करताना खूप त्रास होतो हे माहित असूनही अनेकजण फॅशन म्हणून ते करतात.
तुम्ही पावसाळ्यात टॅटू किंवा पियर्सिंग करून स्वतःला अडचणीत आणू शकता. याशिवाय, जर तुम्ही ते पूर्ण केले असेल, तर घराबाहेर पडण्याची चूक करू नका. कारण पावसात टॅटू किंवा पियर्सिंग केल्याने अॅलर्जी होऊ शकते.
टॅटूसाठी वापरल्या जाणाऱ्या परमनंट शाईमध्ये अनेक प्रकारची घातक रसायने असतात, ज्यामुळे रियॅक्शन होऊ शकतात.
बऱ्याचदा शरीरावरील ती जागा जिथे तुम्ही पियर्सिंग घालता, तिथे जखम होण्याची शक्यता असते.
कारण त्या ठिकाणी पावसाचे पाणी पडल्याने इन्फेक्शन होते. ज्यामुळे तिथे अशी जखम होते, ज्यासाठी तुम्हाला सर्जरी करण्याचा प्रसंग पडू शकतो.
तुमची फॅशन तुमच्या मोठ्या अडचणीचे कारण बनू शकते. म्हणून जर तुम्ही पावसाळ्यात टॅटू आणि पियर्सिंग करण्याचा विचार करत असाल. तर, जरा थांबा. जेणेकरून तुम्ही कोणत्याही अडचणीत येणार नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here