सध्याच्या बिजी लाइफस्टाइलमध्ये लोक इतके अडकले आहेत की त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळ नाही. प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमध्ये लोकांना जेवणासाठी सुद्धा वेळ नसतो. याच कारणामुळे लोक नाश्ता किंवा दुपारचे जेवण त्यांच्या कारमध्ये करून घेतात. कधीकधी, कारमध्ये अन्न बराच वेळ ठेवले जाते, ज्यामुळे कारमध्ये वास येऊ लागतो. बऱ्याच वेळा तुम्हाला कारमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे अस्वस्थ वाटू लागते आणि त्यात आता पावसाळा सुरु आहे ज्यामध्ये असा वास येणे सामान्य बाब आहे, म्हणून आज आम्ही तुम्हाला असे टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या कारमधील सुगंध कायम ठेवू शकतो.

जर तुम्ही रोज कारने प्रवास करत असाल तर कारची स्वच्छता खूप महत्वाची आहे. कारमध्ये कोणतेही दुर्गंधी असलेले पदार्थ ठेवू नका. अनेकदा Chips, Cold drinks, Hard drinks कारमध्ये प्यायल्यानंतर त्याचे रॅपर कारमध्येच राहतात, ज्यामुळे कारमध्ये वास निर्माण होतो आणि कारमध्ये लावलेला परफ्यूम इफेक्टिव नसतो, त्यामुळे अशावेळी साफसफाई खूप महत्वाची असते.




Esakal