नायगाव (उस्मानाबाद): कर्नाटक, विदर्भ, कोल्हापूर या भागात दिसणाऱ्या वनगव्याचे नायगाव (ता. कळंब) शिवारात दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. याबाबत वन विभागास माहिती देण्यात आली असून, त्याला तत्काळ पकडून जंगलात सोडावे, अशी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.

सध्या शेतकरी खरीप पिकाच्या मशागतीत व्यस्त आहेत. असे असतानाच रविवारी (ता. एक) दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान येथील शेतकरी राजाभाऊ शितोळे, बालाजी कोकाटे, गणेश गोरे यांना गवा दिसून आला. त्यांनी त्याचे मोबाइल फोनमध्ये छायाचित्रे घेतली. दरम्यान, भीतीपोटी शेतकऱ्यांनी पळ काढला. पुढे गवा टप्प्याटप्प्याने अनेकांच्या शेतात दिसून आला. याची माहिती येथील ज्येष्ठ नागरिक राजाभाऊ पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. या बाबत शिराढोणचे वनरक्षक डी. एच. कांबळे यांनी वन सेवक ए. पी. डोंगरे यांना नायगाव येथे पाठवण्यात आले.
Also Read: माजी आमदार नागनाथराव रावणगावकर यांचे निधन
गव्याला कसलीही इजा करू नये. तो स्वतःच दुसरीकडे निघून जातो; तसेच गवा या वन्य प्राण्याविषयी चुकीची अफवा पसरू नये. ज्या शेतकऱ्यांनी त्याला पाहिले आहे, अशा ठिकाणी जाऊन पाहणी करण्यासाठी सोमवारी सकाळीच वन विभागाच्या वनरक्षक व वनपाल यांना पाठविले आहे.
– अण्णासाहेब मुंडे, वनपाल, कळंब
Esakal