जगभरातील प्रेक्षकांना वेड लावलेल्या ‘मनी हाइस्ट’ या वेब सीरिजचा पाचवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यातही प्रोफेसरची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्ते हा विशेष लोकप्रिय ठरला आहे.

अल्वारो मोर्तेचा जन्म २३ फेब्रुवारी १९७५ रोजी स्पेनमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
अल्वारोने आधी कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. मात्र त्यात त्याचं मन रमलं नाही. म्हणून नंतर त्याने नाट्यकलेत प्रवेश घेतला. फिनलँडच्या टेम्पेरे विद्यापिठातून त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
२०११ साली अल्वारोच्या डाव्या पायात ट्युमरचं निदान झालं होतं. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर आपल्याला पाय गमवावा लागतो की का, याची त्याला भीती वाटत होती. मात्र अल्वारोने कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली.
अल्वारोच्या करिअरमध्ये ‘मनी हाइस्ट’ हा सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट ठरला. संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांनी या वेब सीरिजला डोक्यावर उचलून घेतलं. प्रोफेसरची भूमिका साकारणारा अल्वारो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
प्रोफेसरची भूमिका अल्वारोना सहजासहजी मिळाली नव्हती. त्याने पाच वेळा या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. पाचव्या प्रयत्नात प्रोफेसरची भूमिका त्याच्या पदरात पडली.
प्रोफेसर म्हणून काम करणारा मोर्ते वास्तव जीवनातही प्राध्यापक आहे. हे फार कमी जणांना माहिती आहे. वास्तव जीवनातही प्राध्यापक असणा-या मोर्तेचा स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे. एका रिपोर्टनुसार त्यानं कॉलेजमधील मुलांना शिकवले आहे. फिनलँडमधील टेम्पेरे विश्वविद्यालयात त्याने प्राध्यापक म्हणून काम केले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here