रक्षाबंधन म्हणजेच राखी पोर्णिमा. भारतीयांसाठी बहिण-भावंडासोबतचे नाते आणखी दृढ करण्याचा आणि एक सुट्टी आनंदाने घालविण्याचा दिवस. राखी हे रक्षण आणि काळजी व्यक्त करण्याचे प्रतिक मानले जाते. दरवर्षी हा दिवस आपण उत्साहात, आनंदात साजरा करतो आणि नवनवीन आठवणी निर्माण करत असतो. रक्षांबधन दिवशी पारंपारिक पेहराव कर, गोड मिठाई खाऊन आपल्या कुटुंबासोबत घरामध्ये छान वेळ घालवतो. यंदाही रक्षाबंधन साजरा करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे प्लॅन तयार करत असाल तर थोड थांबा हे वाचा. तुम्हाला रक्षबंधनासाठी घर कसे सजविता येईल याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

फुलांची रांगोळी (Flower Rangoli) :

पारंपारिक पावडरच्या रांगोळीपेक्षा फुलांच्या रांगोळी जास्त आकर्षक आणि सुंदर दिसते. फुलांच्या रांगोळीमुळे घराच्या सुंदरते भर पडतेच पण फुलांचा सुंगध घरभर दरवळतो आणि प्रसन्न वातवरणही तयार होते. तुम्ही फुलांची रांगोळी साठी झेंडु, गुलाब, सुर्यफुल, ट्युलिप, डेझी या फुलांचा किंवा त्यांच्या पाकळ्यांचा वापर करु शकता. तुम्ही काही ताज्या पानांचाही वापरही रांगोळीमध्ये करू शकता. घरातील प्रत्येक कोपऱ्यात फुलांची रांगोळी काढून तुम्ही घर सजवू शकता. या रांगोळीसोबत पणती ठेवल्यास रांगोळीची शोभा आणखी वाढेल.

स्कार्फ पिलोज(Scarf pillows) :

घराची सजावट करताना आपण बेडशीट, उशांचे कव्हर सर्व काही नवीन वापरतो. आता उशांसाठी बेडशीटचे कव्हर वापरण्याऐवजी आता सुंदर स्कार्फचा वापर सजावटी साठी करा. तुमचा आवडता स्कार्फ पसरवून त्यात उशी गुंडाळा. स्कार्फ गुंडाळताना बो सारखा आकार समोरच्या बाजूला घ्या. वेगवेगळ्या पध्दतीने विविध रंगाचे स्कार्फ उशीला गुंडाळून तुम्ही घराची सजावट करू शकता.

राखीचा पुनर्वापर Recycled Rakhi

घराच्या सजावटीसाठी जुन्या रांख्यांचा कलात्मकतेने वापर करा. जुन्या राख्या एकत्र बांधून त्याचे तोरण बनवू शकता. जुन्या राख्यांचा पुनर्वापर केल्यामुळे घराला वेगळा लूक तर येईल पण जुन्या राख्या पाहून तुमच्या आठवणींनाही उजाळा मिळेल.

लाईटिंग करा (Serene fairy lights) :
तुमच्या घरात उत्साहाचे आणि चैतन्य निर्माण करण्यासाठी तुम्ही लाईटिंग वापर करू शकता. घराच्या भिंतीला किंवा एखाद्या टेबलाला लायटिंगची माळ लावून सजावट करू शकता. तुम्ही घराच्या कोपऱ्यांमध्ये स्टार आकाराचे लाईटिंग वापरू शकता. त्यामुळे तुमच्या घराला एकदम क्लासी लूक येईल.
पोलराइड्स आणि पेंटिंग्ज (Polaroids and paintings) :
कुटुंबासह रक्षाबंधन हा सण साजरा केला जात असल्यामुळे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असता. तुमच्या घराला थोडा पर्सनल टच देण्यासाठी बहिण-भावंडासह काढलेले पोलराइड्स फॅमिली फोटोग्राफ भिंतीवर चिटकवू शकता. हे फोटो चिटकविताना तुम्ही वेगवेगळे डिझाईन पॅटर्न ट्राय करु शकता ज्यामुळे ते आणखी सुंदर दिसेल. बालपणीच्या फोटो वापरून आठवणींना उजाळा देऊ शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here