राजस्थान राज्याची ओळख तेथील संस्कृती आणि सभ्यतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे परदेशातून येणारे पर्यटक राजस्थानमधून आपला प्रवास सुरू करतात.
जळगावः कोरोना महामारीमूळे (Corona epidemic) संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था बिघडली असून पर्यटन क्षेत्राला (Tourism area) देखील मोठा फटका बसला आहे. आता कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भारतातील अनेक राज्यात लाॅकडाऊन (Lockdown) बाबत अनेक नियम शिथील केले आहे. त्यात तसेच पर्यटनस्थळे (Tourist places) देखील अनेक ठिकाणी खुली झाली आहे. त्यामुळे पर्यटनाचा आनंद तुम्ही घेवू शकतात. त्यात जर तुम्हाला बलून राईडचा (Hoot Balloon ride) आनंद घ्यायची ईच्छा आहे. तर चला जाणून घेवू कोठे आहे बलून राईड..

आग्रा
दिल्ली राजधानीच्या शेजारी असलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे बलून राईडची सुविधा आहे. येथे तुम्ही केवळ बलून राईडचा आनंद घेऊ शकत नाही, तर तुम्ही प्रेमाचे प्रतीक असलेला ताजमहाल देखील पाहू शकता. येथे सकाळ आणि संध्याकाळ बलून राईड करण्याचा योग्य वेळ मानली जाते. आग्राला रस्ता आणि रेल्वे मार्गाने तुम्ही पोहोचू शकतात. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यात आग्रा बलून राईड फेस्टिव्हल आयोजित केले जाते.

जयपूर
राजस्थान राज्याची ओळख तेथील संस्कृती आणि सभ्यतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे परदेशातून येणारे पर्यटक राजस्थानमधून आपला प्रवास सुरू करतात. त्यात या राज्यातील जयपूर हे शहर पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे केंद्र असून येथील बलून राईड देखील प्रसिध्द आहे. जयपूर आणि पुष्करमध्ये बलून राईडची व्यवस्था असून सुमारे 4 हजार फूट उंचीवर बलून राईडचा आनंद तुम्ही घेवू शकतात. 60 मिनिटांसाठी आकाशाचा फेरफटका मारू शकता. आपण गुलाबी शहर देखील पाहू शकता.

सोहना
देशाची राजधानी दिल्ली जवळील हरियाणा राज्यातील सोहना शहर अंतर फक्त 51 किलोमीटर आहे. सोहना हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. सोहना वीकेंड हॉलिडे साजरा करण्यासाठी देखील प्रसिध्द आहे. येथे मोठ्या संख्येने लोक विकेंडला येत असतात. तुम्ही सोहनामध्ये बलून राईडचाही आनंद घेऊ शकता.
Esakal