भारताची युवा महिला कुस्तीपटू सोनम मलिकचा ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवास पहिल्या फेरीतच संपुष्टात आला. 62 किलो वजनी गटात तिला मंगोलियाच्या बोलोरतुया खुरेलखूने पराभूत केले. ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच आखाड्यात उतरलेल्या 19 वर्षीय सोनमने दोन ‘पुश-आउट’ गुण मिळवत सुरुवातीलाच 2-0 अशी आघाडी मिळवली होती.

परंतु आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या खुरेलखूने भारतीय महिला कुस्तीपटूला खाली पाडत दोन गुण मिळवून सामना बरोबरीत आणला. लढत संपण्यासाठी अवघ्या 35 सेकंदाचा कालावधी असताना अनुभवी मंगोलियन खेळाडूने दोन अंक मिळवले. शेवटच्या क्षणी गुण मिळवल्याचा मंगोलियन महिला कुस्तीपटूला फायदा झाला. पिछाडीवरुन घेतलेल्या आघाडीच्या दोन गुणामुळे या लढतीत तिला विजयी घोषीत करण्यात आले.

Also Read: VIDEO पीव्ही सिंधू मायदेशी परतली, पाहा काय म्हणाली

मंगोलियाच्या खेळाडूला या यशाचा आनंद फार काळ टिकवता आला नाही. पुढच्या फेरीत जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावर असलेल्या आणि 2018 वर्ल्ड चॅम्पियन बुल्गारियाच्या तैयब मुस्तफा युसेन हिने तिला पराभूत केले. युसेनही जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.

सोनमचे प्रशिक्षक अजमेर मलिक यांनी पीटीयाला दिलेल्या मुलाखतीनुसार, सोनम मंगोलियाच्या प्रतिस्पर्धीतच्या तुलनेत सरस होती. पण सोनमने अधिक बचावात्मक खेळ केला. ही चूक तिला स्पर्धेतून बाहेर काढण्यास कारणीभूत ठरली. तिला एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याचा अनुभव मिळाला, ही गोष्ट विसरता येणार नाही, असेही ते म्हणाले.

Also Read: नेटकऱ्यांनो सुधरा; खेळाडूंच्या ‘जातीचा खेळ’ थांबवा रे!

लढतीमध्ये दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळ करण्यापेक्षा बचावात्मक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. दोघींनी एकमेकींची ताकदीचा अंदाज घेण्यात अधिक वेळ घेतला. सोनमने सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा घेत आपल्या पडडीतील डाव खेळला असता तर निकाल थोडा वेगळा लागला असता.

दोन वेळा कॅडेट जागतिक चॅम्पियनशिप (2017, 2019) स्पर्धा गाजवणाऱ्या सोनमने एप्रिलमध्ये अल्माटी येथील आशियाई पात्रता फेरीत फायनलमध्ये जागा मिळवत ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले होते. पण तिचा प्रवास पहिल्याच फेरीत संपुष्टात आला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here