नागपूर : अनेकांना गोड खाण्याची सवय असते. यामुळे अनेक आजार होतात हे माहीत असतानाही त्यांची ही सवय जात नाही. अनेक प्रयत्न केल्यानंतरही ते गोड खाणे बंद करू शकत नाही. प्रयत्न करूनही गोड पदार्थांचा मोह काही सुटता सुटत नाही. तेव्हा आहारातल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा साखर हद्दपार करण्यासाठी काय काय करता येईल हे आज आपण जाणून घेऊ या…

आरोग्यदायी आणि अनारोग्यदायी पदार्थांमध्ये फरक करायला शका. कधी काय खायचे हे ठरवा.
गोड खाण्याऐवजी आरोग्यदायी पदार्थांची निवड करा. जास्त काळ उपाशी राहणे टाळा. उकडलेल्या भाज्यांना प्राधान्य द्या.
दिवसभरात कधीही गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. गोड खाण्याच्या तीव्र इच्छेवर नियंत्रण ठेवता आले नाही तर तुमचे वजन वाढू शकते.
गोड खाण्याची इच्छा झाली तर फळ खा. सफरचंद, पेअर, पपई यापैकी काहीही तुम्ही खाऊ शकता. हंगामी फळांचा पर्याय निवडा. जवळ नेहमी फळ असू द्या.
अतिताणामुळे गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी तणाव मुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
गोड खाण्याची इच्छा झाली की लगेच उभे राहा आणि चाला. यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here