प्रसिद्ध युट्यूबर व अभिनेत्री उर्मिला निंबाळकर गरोदर असून नुकताच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. पुण्यातील ढेपेवाडा या ठिकाणी राजेशाही थाटात हा कार्यक्रम पार पडला.

इतकी आनंदाची, पवित्र, दिव्य गोष्ट लपवायची कशाला, असा सवाल करत उर्मिलाने डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या कार्यक्रमासाठी उर्मिलाने हिरवी साडी, त्यावर साजेसे दागिने असा साजशृंगार केला आहे. तिचा हा लूक नेटकऱ्यांना फार आवडला आहे.
उर्मिलाने २०१२ साली सुकिर्त गुमस्तेशी लग्नगाठ बांधली. या वर्षी एप्रिल महिन्यात तिने पतीसोबतचे फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली. उर्मिला आणि सुकिर्त यांची एका थिएटर ग्रुपद्वारे पहिल्यांदा ओळख झाली. सुकिर्त हा पेशाने पत्रकार असून एका पब्लिकेशनसाठी तो काम करतो.
उर्मिलाने अभिनेत्री आणि त्यानंतर युट्यूब कंटेट क्रिएटर अशी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. प्रवास, लाइफस्टाइल, फॅशन यांसारख्या विषयांवर ती आणि तिचा पती मिळून व्हिडीओ बनवत असतात.
सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. उर्मिलाने ‘दुहेरी’ या मराठी मालिकेत भूमिका साकारली होती. तिने काही हिंदी मालिकांमध्येही काम केलंय.
दिया और बाती हम, मेरी आशिकी तुमसे ही यांसारख्या मालिकेत ती झळकली. त्यानंतर उर्मिलाने ‘संगीत सम्राट’ या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन गायक रोहत राऊतसोबत मिळून केलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here