TET परीक्षेसाठी नोंदणी 3 ऑगस्ट 2021 पासून सुरु झाली आहे.
पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेचे (TET) वेळापत्रक जाहीर झाले आहे. येत्या १० ऑक्टोबरला राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर TET परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी 3 ऑगस्ट 2021 पासून नोंदणी सुरु झाली आहे. अधिकृत संकेतस्थळ mahatet.in वर नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 ऑगस्ट (रात्री 11.59) पर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी आजच परीक्षेसाठी नोंदणी करून घ्या.
Also Read: TET Exam: शिक्षक पात्रता परीक्षा होणार दहा ऑक्टोबरला

महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री, वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती की, राज्य शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2021) आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला परवानगी दिली आहे. दोन वर्षांनंतर TETची परीक्षा होणार आहे. म्हणून 10 लाखांहून अधिक इच्छुक उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Also Read: दोन वर्षापासून रखडलेल्या ‘TET’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर

TET परीक्षेसाठी दोन पेपर असतात. यामध्ये एक पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. पेपर एक हा पहिली ते पाचवी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी असते. आणि पेपर दोन सहावी ते आठवी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी असते. प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.
Also Read: TET साठी राज्य शासनाची परवानगी, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

TET परीक्षेच्या या आहेत महत्त्वाच्या तारखा…
– ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 3 ऑगस्ट पासून सुरु झाली आहे.
– या परीक्षेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट आहे.
– परीक्षेचा प्रवेशपत्र (Admit Card) जारी करण्याची तारीख 25 सप्टेंबर आहे.
– पेपर- I(एक) परीक्षेची तारीख: 10 ऑक्टोबर (रात्री 10.30 ते दुपारी 1.00) असा आहे.
– पेपर- II(दोन) परीक्षेची तारीख: 10 ऑक्टोबर (दुपारी 2.00 ते 4.30) असा आहे.
Also Read: शिक्षकांना खुशखबर , सप्टेंबर महिन्यात होणार ‘TET’ परीक्षा

TET परीक्षेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा…?
– सुरवातीला या अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या.
– त्यानंतर होमपेजवर New Registration वर क्लिक करा.
– नोंदणी करून पोर्टलवर लॉग इन करा.
– आवश्यक तपशील भरा आणि अर्ज फी भरा.
– त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट काढून घ्या.
– अशारितीने तुमचा अर्ज भरून पूर्ण होईल.
Esakal