मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय.
पती कुणाल बेनोडेकरसोबत सोनाली मालदीवला गेली असून तिथले काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सोनालीच्या बिकिनी लूकमधील फोटोने नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. मालदीवच्या समुद्रकिनारी कुणालच्या हातात हात देऊन सोनाली हा रोमँटिक फोटो काढला आहे. ‘Spa with a view’ असं कॅप्शन देत सोनाली हा फोटो इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांसोबतच सुबोध भावे, अमेय वाघ, प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत, गौहर खान, हेमंत ढोमे, पर्ण पेठे या सेलिब्रिटींनीही सोनालीच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. यावर्षी मे महिन्यात सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईतील मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांनी लग्न केलं.