बऱ्याचदा शिल्लक उरलेले अन्न आपण गरम केल्यावर खातो, पण तुम्हाला माहित आहे का, की काही पदार्थ आहेत जे तुम्हाला पुन्हा गरम करून खाल्याने हानी पोहोचवू शकतात. जर तुम्ही हे पदार्थ पुन्हा गरम करून खाल्लात तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागेल.

चिकन पुन्हा पुन्हा गरम न करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. यातील प्रोटीन कम्पोजिशन पूर्णपणे बदलते. अन्न पुन्हा गरम केल्याने (डाइजेशन) पचनही बिघडते.

अंड्याची भाजी वारंवार गरम केल्यामुळे देखील बरेच नुकसान होते. त्यात प्रोटीन असतात आणि ते पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात. स्वयंपाक केल्यानंतर शक्य तितक्या लवकर अंडी खावीत. अंड्यातील प्रथिनांसह त्यात असलेले नायट्रोजन गरम केल्याने देखील कर्करोग (कॅन्सर) होऊ शकतो.

मशरूम शिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी खाणे फायदेशीर नसते. त्यात असे अनेक घटक आहेत, जे नंतर आपल्या पाचन तंत्रासाठी हानिकारक असतात. जर मशरूम शिल्लक राहिले असतील तर ते थंड खा, पुन्हा गरम करू नका.

तांदळामध्ये काही जीवाणू असतात. जेव्हा आपण भात शिजवतो तेव्हाही ते त्यात जीवाणू असतात, परंतु ते शरीराला हानिकारक नसतात. त्याच वेळी, भात शिजवल्यानंतर, जेव्हा रूम टेम्परेचरवर बराच वेळ ठेवला जातो, तेव्हा हे जीवाणू बॅक्टीरियामध्ये कन्वर्ट होतात. जेव्हा हे बॅक्टीरिया तुमच्या शरीरात जातात, तेव्हा तुम्हाला फूड पॉइजनिंग होऊ शकते.

पालक किंवा इतर हिरव्या भाज्या पुन्हा गरम केल्यानंतर कधीही खाऊ नका. पालकमध्ये भरपूर लोह (आयरन) असते आणि ते पुन्हा गरम केल्यावर ते ऑक्सिडीज होते. आयरन ऑक्सिडेशनमुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.
Esakal