छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. लवकरच काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. तर काही मालिका या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत. प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या नव्या मालिका आणि शो कोणते ते पाहूयात…

‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये बॉलिवूडमध्ये विषेश ओळख निर्माण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनेक वर्षांनंतर या मालिकेमधून श्रेयस पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे. श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे.
‘मनं झालं बाजिंद’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे कलाकार पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहेत. राया-कृष्णा या दोघांच्या प्रेमकहाणी या मालिकेचे कथानक आधारित आहे.
‘ती परत आलीये’ ही नवी मालिका झी मराठी वाहिनीवर १६ ऑगस्टपासून रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेमध्ये ज्येष्ठ अभिनेते विजय कदम हे एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपुर्वी मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला. प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं की विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये हत्या होते त्यामुळे सावध राहा असा इशारा देताना दिसत आहेत. नक्की ही भानगड काय आहे? या मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेत? ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या नव्या मालिकेमध्ये अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका ३० ऑगस्टपासून रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.
‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री हृता दुर्गुळेचा चाहता वर्ग मोठा आहे. हृता ‘मन उडु उडु झालं’ या नव्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका ३० ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हृतासोबत अभिनेता अजिंक्य राऊत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
‘मी होणार सुपस्टार’ या नव्या शोमधून सुपरस्टार अंकुश चौधरी तब्बल १५ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री घेणार आहे. २१ ऑगस्टपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभावान कलाकार या शोच्या मंचावर येणार आहेत.
बिग बॉस मराठी या शोच्या दोन सिझनला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या शोच्या गेल्या दोन्ही सिझनचे सूत्रसंचालन मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी केले.लवकरच या शोचा नवा सिझन म्हणजेच ‘बिग बॉस मराठी ३’ हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनचा प्रोमो महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियावर शेअर करत लिहीले होते, ‘त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार राहा #BiggBossMarathi3 लवकरच #ColorsMarathi वर’

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here