राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि डॉक्टर सेलच्या माध्यमातून कोकणासह ६ जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी १३५ पेक्षा जास्त आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीरे आयोजित करण्यात आली.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या माध्यमातून कोकणासह ६ जिल्हयातील पूरग्रस्तांसाठी १३५ पेक्षा जास्त आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीरे घेण्यात आले.
राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी दिली.
महाराष्ट्रातील कोकणासह एकूण ६ जिल्हयात पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला.
काही दिवस काही भाग पाण्याखाली राहिल्याने वित्त व जिवितहानी झाली.
पूराचे पाणी घरात व परिसरात बराच काळ राहिल्यामुळे रोगराईचा मोठा धोका निर्माण होणार असल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने मदतीचा हात पुढे केला व पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत पोचविण्याच्या सूचना डॉक्टर सेलला केल्या.
त्यानुसार, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने डॉक्टरांच्या मदतीसाठी दहा रुग्णवाहिका व डॉक्टरांची ने-आण करण्यासाठी गाड्यांची उपलब्धता करुन दिली. तर केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून मुबलक व सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती.
डॉक्टर सेलच्या २०० डॉक्टरांनी पूरग्रस्त भागात आपले कर्तव्य बजावले.
खोकला, ताप, सर्दी, उलटी, बचाव कार्यात झालेल्या छोट्या- मोठ्या जखमा, लेप्टोस्पायरॉसिस, पायांना बुरशी आदी आजारांवर उपचार केले.
काही गावात रस्ता वाहून गेल्यामुळे औषधांचे साहित्य डोक्यावर घेत डॉक्टरांनी बाधित लोकांची सेवा केली.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्यावतीने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या सर्व जिल्हयातील पूरग्रस्त भागात आरोग्य शिबीरे घेतली तर सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्हयातील काही भागात अजून शिबीरे घेण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादीचा डॉक्टर सेल नैसर्गिक आपत्ती किंवा महामारीमध्ये जनतेला वैद्यकीय मदत असेल किंवा यापूर्वी २०१९ चा पश्चिम महाराष्ट्रातील पूरावेळीही आणि कोरोना महामारीत, मराठवाड्यातील दुष्काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक समुपदेशन आदी कामात अग्रेसर राहिला आहे.
या वैद्यकीय शिबिरांच्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त माजी आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, आमदार सुनिल शेळके, नितीन देशमुख, फ्रंटल व सेल समन्वयक सुहास उभे यांचे सहकार्य लाभल्याचे दिसून आले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here