भारताची पहिलीवहिली स्वदेशी (Made in India) बांधणीची विमानवाहू युद्धनौका (Aircraft carrier) विक्रांत (Vikrant Warship) हिच्या समुद्री चाचण्यांना (Sea Trials) आजपासून सुरुवात झाली. ही युद्धनौका कोचीन (Kochi) शिपयार्डमध्ये बांधण्यात आली आहे. ब्रिटिश बनावटीची भारताची सर्वात पहिली युद्धनौका विक्रांत निवृत्त झाल्यावर तिच्याच नावाने ही युद्धनौका भारतात बनवण्यात (Reincarnated) आली. विक्रांतची बांधणी पूर्ण झाल्यावर तिच्या बंदरात चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर आज ती खोल समुद्रातील चाचण्यांसाठी बंदराबाहेर पडली. या चाचण्या पूर्ण झाल्यावर यथावकाश तिला नौदलाच्या (Navy) सेवेत समाविष्ट केले जाईल. सध्या भारताकडे रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य (INS Vikramaditya) ही एकच विमानवाहू युद्धनौका आहे. विमानवाहू युद्धनौका विक्रांत चे काही विहंगम छायाचित्रे