पश्चिम बंगाल या राज्याचे सौंदर्य पाहण्यासारखे असून लाखो पर्यटक येथे येत असतात. तसेच येथील नैसर्गिक ठिकाणांना आवर्जून भेट देत असतात.
जळगावः भारतातील पश्चिम बंगाल हे राज्य अतिशय सुंदर असून येथील भरपुर वनसंपद्दा असलेले आहे. त्यामुळे या राज्याचे सौंदर्य पाहण्यासारखे असून लाखो पर्यटक येथे येत असतात. तसेच येथील नैसर्गिक ठिकाणांना आवर्जून भेट देत असतात. त्यात येथील ही राष्ट्रीय उद्याने पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना वन्यप्राणी सोबत वनस्पती सुंदर दृश्य पाहण्यास मिळतात. चला तर जाणून घेवू पच्छिम बंगाल मधील राष्ट्रीय उद्यानांबद्दल..

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान
पश्चिम बंगाल मध्येच नव्हे तसे संपूर्ण देशात सुंदरबनचे नाव अग्रस्थानी आहे. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल म्हणून देखील ओळखले जाते. हे एक टायगर रिझर्व्ह पार्क असून येथे 400 पेक्षा जास्त रॉयल बंगाल वाघ आहेत. 30 हजारांपेक्षा जास्त हरणांची संख्या आहेत. तसेच वन्यप्राणी सोबत या जंगलातील सुंदर निर्सगाचे दृश्यांचा अदभूत दृष्य पर्यटकांना पाहण्यास मिळते.

नीरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान
नीरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी आवडीचे ठिकाण आहे. सुमारे 88 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे उद्यानाचा विस्तार असून हे असे एक राष्ट्रीय उद्यान आहे जेथे तुम्हाला लाल पांडे आणि काळा एशियाटिक अस्वल अगदी जवळून पाहण्यास मिळेल. येथे दर महिन्याला लाखो पर्यटक येत असतात. येथील नैसर्गिक वातावरण स्वर्गापेक्षा कमी नसून कुटुंब किंवा मित्रांसह येथे फिरायला येणाऱ्यांची संख्या आधिक आहे.

बक्सा राष्ट्रीय उद्यान
भूतान आणि आसामच्या सीमेवर बक्सा राष्ट्रीय उद्यान असून या उद्यानात दुर्मिळ वन्यजीवांसाठी हे उद्यान ओळखले जाते. येथे अनेक प्राणी असे आहेत जे भारताच्या कोणत्याही राष्ट्रीय उद्यानात नाही. सुमारे 759 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1983 साली व्याघ्र प्रकल्प म्हणून झाली. बंगाल टायगर, हत्ती, इंडियन सिव्हेट, पाम सिव्हेट, वन्य कुत्रे इत्यादी अनेक प्राणी येथे आहे.

सिंगिला राष्ट्रीय उद्यान
सिंगिला राष्ट्रीय उद्यान कोणत्याही निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नसून हे समुद्रसपाटीपासून 7 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर आहे. या उद्यानाच्या उत्तरेकडील कांचनजंगा पर्वत आणि दक्षिणेकडे गंगा नदी आहे. त्यामुळे पर्यटकांना अतिशय सुंदर दृश्य या उद्यानात पाहण्यास मिळतात. तसेच हिमालय पर्वताच्या रांगा येथून दिसतात. तसेच उद्यानात बंगाल टायगर, स्पॉटेड हरण आणि रानडुक्कर सारखे अनेक प्राणी आहे.
Esakal