गोव्याच्या किनारपट्टीवरील अस्सल मंगलोरियन फिश करीपासून क्रिस्पी फ्राईड कलमारीपर्यंत स्वादिष्ट सी-फूड तुम्हाला पुण्यात मिळू शकते. पण कुठे? तुम्हाला आवडतील असे टेस्टी आणि बजेटमध्ये बसतील अशी 10 सी-फूड ठिकाणं फक्त तुमच्यासाठी!

1: आय अ‍ॅम लायन, स्ट्रीक्टली नॉन- व्हेजटेरिअन

बाणेरमधील हे रेस्टॉरंट घरगूती पद्धतीच्या चवीच्या मंगोरियन क्युजिनसाठी प्रसिध्द आहे. सी-फूड थाळीपासून ते फ्राईड सी-फूडचे स्वादिष्ट पदार्थ, कोंळबी (प्रॉन्स) करी, भात आणि नीर डोसा ते मंगोरियन स्टाईल सुक्का मसालापर्यंत सर्व काही येथे मिळेल. तसेच येथील मसालेदार कोकणी कोळंबी पुलाव तुम्ही ट्राय केलाच पाहिजे. दोघांना पुरेल आणि खिशाला परवडेल अशा बजेटमध्ये तुम्हाला येथे चवदार सी-फूड मिळेल.

Sea Food

कुठे : आय अ‍ॅम लायन, स्ट्रीक्टली नॉन- व्हेजटेरिअन, बाणेर

किंमत : 800 रुपये दोघांसाठी

2: निसर्ग

पुण्यातील पश्चिम भागात प्रामख्याने फ्रेश सी-फूड साठी प्रसिध्द असेलेले निर्सग रेस्टारंटमध्ये तुम्हाला वेगवेळ्या सी-फूडचे प्रकार मिळतील. सुरमई चटपटा, पापलेट टिक्का, आणि बोंबिल फ्रायसोबत सोलकढी तुम्ही स्टार्टरमध्ये ट्राय करू शकता. मेन कोर्समध्ये तुम्हाला पापलेट मसाला, सुरमई देशी करी मिळेल, ज्यामध्ये पर्याय म्हणून हिरवा मसाल्यातील पापलेट देखील ट्राय करू शकता. तसेच तुम्हाला तिथे खेकडा निवडता येईल आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार डिश बनवून देतील.

Sea Food

कुठे : निसर्ग, एरंडवणे

किंमत : दोघांसाठी 1300 रुपये

Also Read: आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी

3 : गजाली

मुंबईतील विलेपार्ले (देशांतर्गत विमानतळाजवळ) मध्ये एकेकाळी सुरू झालेल्या सी-फूड भोजनालयाची आता आंतरराष्ट्रीयस्तरावर वेगवेगळ्या शाखा आहेत. गजालीची बोंबिल फ्राय या डिशला ग्राहकांची खूप पसंती मिळते. येथील ग्रीन चिलीच्या सॉससोबत तिसऱ्या कोशिंबिरी ही डिश नक्की ट्राय करा. किंमत थोडी जास्त असली तरी चव मात्र चांगली आहे.

Sea Food

कोठे : गजाली, बंड गार्डन रोड, कॅम्प

किंमत : दोघांसाठी 1400 रुपये

4: कॅफे गोवा

पुण्यातील गोवन रेस्टॉरंटपैकी कॅफे गोवा हे प्रसिध्द आहे. या सीफूड रेस्टॉरंटमध्ये, कॅफ्रियल, झॅकुटी, विंदालू, रेकेडो, गोवन करी आणि कॅल्डिन सारखे लोकप्रिय पदार्थ तुम्हाला तुमच्या आवडीच्या सी-फूड किंवा चिकनसोबत दिले जाते. बांगडा फ्राय, चिकन कॅफ्रेअल, रॉस ऑमलेट, गोवन स्ट्रीट स्नॅकस् हे पदार्थ नक्की ट्राय करा. गोवन पदार्थांची चव चाखायची असेल तर नक्की येथे भेट द्या

Sea Food

कोठे : कॅफे गोवा, विमाननगर

किंमत : 550 रुपये दोघांसाठी

Also Read: आखाड स्पेशल : नॉन-व्हेज तडक्याचा बेत ‘या’ डिशनं करा झणझणीत

5. जंजिरा सी-फूड

गेल्या 21 वर्षापासून पुण्यात उत्तम सी-फूडसाठी हे रेस्टारंट प्रसिद्ध आहे. जंजिरामधील तंदुरी सुरमई, तंदुरी खेकडा आणि पापलेट तवा या डिशला ग्राहकांच्या पसंती जास्त आहे. मालवणी, गोवन, आणि मंगोरियन स्टाईल सुरमई एकदा खाऊन बघतीलच पाहिजे. तुम्हाला जर कोळंबी (प्रॉन्स) आवडत असतील तर तंदुर किंवा करी स्टाईल जम्बो प्रॉन्स तवा पुलाव तुम्हाला नक्की आवडेल. जंजिरा हे सी-फूडसाठी परफ्रेक्ट फॅमिली रेस्टारंट आहे.

Sea Food

कोठे : जंजिरा, शास्त्री रस्ता

किंमत : 1000 रुपये दोघांसाठी

6: फिश करी राईस

फिश करी राईस या रेस्टॉरंटमध्ये सर्व प्रकारचे लोकल कोस्टल सी-फूड मिळेल. या रेस्टॉरंटमध्ये नेहमी ग्राहकांची गर्दी असते. येथील पापलेट पेडावन आणि भाकरी नक्की ट्राय करा. तसेच पापलेट आणि प्रॉन्स सोडून येथे वेगवेगळ्या प्रकारच्या बोंबिल, तिसऱ्या, खेकडा, बांगडा देखील मिळतात. करी असो की, फ्राय सी-फूड घरगूती आणि अस्सल मसाले वापरले जातात. येथील सर्व पदार्थांची किंमत तुमच्या बजेटमध्ये बसतील अशाच आहे.

sea Food

कोठे : फिश करी राईस, नारायण पेठ

किंमत : 1300 रूपये दोंघासाठी

7 मासा : Massa

मासा हे छोटे 7 टेबल असलेले ढाबा स्टाईल हॉटेल आहे. मुंढव्यामध्ये असेलेल्या या हॉटेलमध्ये विविध थाळी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे. येथील चिकन स्पेशल थाळी, सुरमई रवा फ्राय थाळी चांगली आहे. सुरमई थाळीमध्ये साजुक तुपात तळलेली रवा फ्राईड सुरमई दिली जाते. दोन्ही थाळीमध्ये एक सुका नॉनव्हेज पदार्थ आणि 2 वाटी करी दिली जाते. दोन बाजरी किंवा ज्वारीची भाकरी आणि वाटीभर भात दिला जातो. तुम्हाला जर छोट्या जागी खायला आवडत असेल तर हा उत्तम पर्याय आहे.

Maasa

कोठे : मासा, मुंढवा

किमंत : 170 पासून पुढे

8: कोकनट ग्रोव्ह रेस्टो बार

सी-फूड लव्हरसाठी एकदम हे योग्य ठिकाण असून येथील सर्व पदार्थ स्वादिष्ट आहेत. पापलेट पोलिचाथु ते मालवणी फिश फ्रायपर्यंत तुम्हालापापलेट, सुसमई, रावस, खेकडा, कोळंबीसारखे नानविध पर्याय मिळतील. येथील सी-फूड फ्रेश असून त्याचा (वशाळ) वास येत नाही. तुम्ही नक्कीच येथे येऊन निराश होणार नाही.

sea Food

कोठे : कोकनट ग्रोव्ह रेस्टो बार, मंगळवार पेठ

किंमत : 1200 रुपये दोंघासाठी

9: मासेमारी : द फिशिंग

सदाशिव पेठेत प्रसिध्द असलेले मासेमारी रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला मंगोरियन, गोवन आणि कल्याण येथील मिक्स डिशेस मिळतील. तुम्ही तुमच्या आवडीचा मासा निवडून वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस् मागवू शकता. येथील सी-फूड फ्रेश आहे. तसेच येथील बटर गार्लिक क्रिस्पी फिश फ्राय नक्की ट्राय करा. मसाला डिशेसमध्ये तुम्हाला कोल्हापूरी मसाला, कोकणी, मुंबई, असे आंबट- तिखट प्रकारचे पदार्थ मिळतील. तुम्हाला कमी तिखटपासून खूप तिखट जसे तुम्हाला हवे तसे पदार्थ तयार करून देतात.

कोठे : मासेमारी : द फिशिंग, सदाशिव पेठ

किंमत : 1200 रूपये दोघांसाठी

10: फ्रेश ऑफ द बोट

फ्रेश ऑफ द बोट या रेस्टारंटमध्ये क्रिस्पी बोंबिल कोळीवडा आणि स्टफड् मसाला पापलेट हे पदार्श नक्की ट्राय करा. तुम्हाला येथे चायनिज क्यूजिन आणि सी-फूड सिजलरसाठी बरेच पर्याय मिळतील. येथील फिश/प्रॉन्स थाळी किंवा करी राईस देखील तुम्ही निवडू शकता.

sea Food

कोठे : फ्रेश ऑफ द बोट, एरंडवणे

किंमत : 900 रुपये दोघांसाठी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here