नागपूर : आईचे दूध हे बाळासाठी उपयुक्त मानले जाते. बाहेरील दूध हे बाळासाठी पचायला जड असते. बाहेरील दुधामधील घटकांमुळे मुलं लठ्ठ होण्याची शक्यता असते. ज्या मुलांना बाहेरील दूध दिले जाते ती मुलं गुबगुबीत दिसतात. तर ज्या मुलांना स्तनपान देण्यात येते ती मुले बाहेरचे दूध पिणाऱ्या मुलांच्या तुलनेत बारीक असतात. मात्र, निरोगी असतात. यामुळे आपल्या बाळाला लठ्ठपणापासून दूर ठेवण्यासाठी स्तनपान करा, असा सल्ला राज्य कामगार विमा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक तसेच बालरोगतज्ज्ञ डॉ. मिना देशमुख यांनी दिला.

बाळाच्या जन्मानंतर तासाभरात बाळाला स्तनपान करा. कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी स्तनपान महत्त्वाचे आहे. बाळाचा जन्म होताच आईच्या दुधातून पिवळसर रंगाचे घट्ट दूध येते, त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. त्यात भरपूर पोषक प्रथिने असतात. अनेक रोगप्रतिकारक घटक असतात. यामुळे बाळाचे जंतुसंसर्गापासून संरक्षण होते, असे डॉ. देशमुख म्हणाल्या.

Also Read: वृद्ध दाम्पत्याचे हातपाय बांधून दागिन्यांसह रोख लंपास, पोलिसांत तक्रार दाखल

स्तनपानाचे मातेला होणारे फायदे

बाळाच्या जन्मानंतर लवकर स्तनपान केल्यामुळे आईचे गर्भाशय आकुंचन पावते आणि रक्तस्राव किंवा रोगसंसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो. गर्भाशय पूर्वस्थितीला लवकर येते.गरोदरपणात वाढलेले मातेचे वजन कमी होते. मातेच्या हाडातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढते. स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. स्तनपान करण्याचे आई आणि बाळ ह्यांच्यात भावनिक सुरक्षेचे सुंदर नाते तयार होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here