पुणे – सकाळ माध्यम समुहाच्या ‘सकाळ एनआयई’ (न्यूज पेपर इन एज्युकेशन) (Sakal NIE) व सकाळ इंडिया फाउंडेशन (Sakal India Foundation) उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व शिक्षकांसाठी मागील काही महिन्यांपासून ‘मैत्री डिजिटल युगाशी’ ही मोफत मार्गदर्शन कार्यशाळा (Free Workshop) ऑनलाइन पद्धतीने (Online Process) आयोजित करण्यात येत आहे. या मालिकेतील नववी मार्गदर्शन कार्यशाळा शुक्रवार (ता. ६) सायंकाळी साडेचार वाजता झूम वेबिनारवर होणार आहे.

यात ‘एकविसाव्या शतकातील उपक्रमशील शिक्षक व वर्गापलीकडील मुक्त शिक्षणपद्धती’ या विषयावर मलावी देशातील व ‘ग्लोबल टीचर अवार्ड’च्या जागतिक स्पर्धेत अंतिम पन्नास स्पर्धकांमध्ये निवड झालेल्या मार्गदर्शक, शिक्षिका चिफुनिरो एम‘म्यांगो-कामवेन्डो यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Also Read: पुणे : समाविष्ट २३ गावांच्या हद्दीत ‘डोंगर माथा-उतार’

कोण आहे चिफुनिरो कामवेन्डो…

चिफुनिरो एम‘म्यांगो-कामवेन्डो या मलावीमध्ये मलावी विद्यापीठ, चान्सलर्स महाविद्यालय आणि माध्यमिक शाळेत इंग्रजी विषयाच्या जागतिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. ‘मानवतेतील शिक्षण’ या विषयात त्यांनी पदवी संपादन केली आहे. त्या शिक्षणातील धोरण, नियोजन आणि नेतृत्व या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत. जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी, यूएसए, फुलब्राइट टीचिंग एक्सलन्स ॲण्ड अचीव्हमेंट (टीईए) या कार्यक्रमांतर्गत त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे. आयएफईएनएसओ या शैक्षणिक संस्थेच्या त्या संस्थापक आहे.

या विषयांवर होणार मार्गदर्शन

  • एक उत्कृष्ट नेतृत्व म्हणून शिक्षकांनी कसे असावे

  • वर्गापलीकडील मुक्त शिक्षणाच्या विविध नावीन्यपूर्ण पद्धती

  • अध्यापन करताना विद्यार्थी केंद्रित अनुकूल वातावरण कसे तयार करावे

  • सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीचा अवलंब कसा करावा.

असे व्हा सहभागी….

वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेली लिंक क्लिक करून किंवा क्युआर स्कॉन करून नोंदणी करावी. त्यानंतर आपल्या ई-मेल आयडीवर झूम वेबिनारची लिंक, आयडी व पासवर्ड मिळेल.

लिंक : https://www.sakalindiafoundation.com/webinar.php

अधिक माहितीसाठी संपर्क : ८३७८९९३४४६ किंवा ९९२२९१३४७३

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here