बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया देशमुखचा आज 31वा वाढदिवस. यानिमित्ताने जाणून घेऊयात तिच्या आयुष्याबद्दल आणि लव्ह स्टोरीबद्दलच्या काही खास गोष्टी….

जेनेलियाने 15 व्या वर्षी एका जाहिरातीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या जाहिरातीमध्ये तिने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. जाहिरातीच्या निर्मात्यांनी जेनेलियाला एका लग्नामध्ये पाहिले होते. या जाहिरातीच्या शूटिंगच्या दुसऱ्या दिवशी जेनेलियाची परीक्षा होती, तरी देखील ती या जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी तयार झाली. तेव्हा आमिताभ यांच्यासोबत तिला एका पेनची जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर जेनेलियाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले.
अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्याआधी जेनेलियाला क्रिडा क्षेत्राची प्रचंड आवड होती. कॉलेजमध्ये असताना जेनेलिया राज्यस्तरीय खेळाडू आणि राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू होती.
जेनेलियाला समाज कार्य करण्याची देखील आवड आहे. तिने ‘नेत्रू’, ‘नलाई’ आणि ‘इंद्रू’ हे स्टेज शो देखील केले आहेत. हे शो बेघर महिला आणि मानसिक आजारांची काळजी घेणाऱ्या संस्थेसाठी निधी गोळा करतात
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय कपल आहे. जेनेलियाने आणि रितेशने 2003 मधील तुझे मेरी कसम या चित्रपटामध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले. जेनेलियाने या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान रितेश आणि जेनेलियामध्ये मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 2012 साली रितेश आणि जेनेलियाने लग्नगाठ बांधली. एका मुलाखतीमध्ये रितेशने जेनेलियासोबतच्या पहिल्या भेटीतबद्दल सांगितले होते की, ‘ माझे वडिल मुख्यमंत्री असल्याने जेनेलिया चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान माझ्यासोबत एकही शब्द बोलली नाही. तिला वाटले की माझ्यामध्ये खूप माज असेल. त्यावेळी जेनेलियाने मला विचारले होते की तुझे सुरक्षारक्षक कुठे आहेत? तेव्हा मी तिला सांगितले होते की माझ्याकडे सुरक्षारक्षक नाहित.’
जेनेलियाच्या नावचा देखील एक वेगळा अर्थ आहे. तिचे नाव हे तिची आई जीनेट डिसूझा आणि वडिल नील डिसूझा यांच्या नावांना एकत्र करून ठेवण्यात आले आहे. जेनेलियाचे घरचे टोपण नाव हे ‘जेनू’ असे आहे.
जेनेलिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते रितेश आणि मुलांसोबतचे धमाल मस्तीचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here