बॉलीवूडमधील एका प्रख्यात अभिनेत्रीचा आज जन्मदिवस आहे. ज्या अभिनेत्रीनं आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये एक वेगळा ट्रेंड सेट केला अशा काजोलची क्रेझ आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. तिचा कुछ कुछ होता है असेल किंवा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे असेल, त्यात तिनं जो अभिनय केलाय त्याच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.

वेगवेगळ्या पुरस्कारांनी आतापर्यत काजोलला सन्मानित करण्यात आलं. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या काजोलचा फॅन बेस अजूनही कमी झालेला नाही.
एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून काजोलचं नाव घ्यावं लागेल. 30 वर्षांहून अधिक काळ तिची बॉलीवूडमधील जर्नी आहे. वयाच्या 16 व्या वर्षांपासून तिनं बॉलीवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. स्वभावानं गंमतीशीर असणाऱ्या काजलनं अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

सर्वात कमी वयात पद्मश्री पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री म्हणून काजलच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. असा पुरस्कार मिळवणारी ती दुसरी व्यक्ती आहे. भारतीय सिनेमासाठी दिलेलं योगदान यासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पद्मश्री पुरस्कारानंतर काजोलला कर्मवीर पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय सामाजिक न्याय आणि विकास या कामासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
बऱ्याचजणांना एक गोष्ट माहिती नाही ती म्हणजे काजोलनं एका रियॅलिटी शो मध्ये जजची भूमिका केली आहे. त्या शो चे नाव रॉक अँड रोल असे होते. तो सिगिंशी संबंधित शो होता.
काजल ही भगवान शंकराची भक्त आहे. जर तुम्ही तिचे फोटो बारकाईनं पाहिल्यास तिच्या अनेक फोटोंमध्ये ओम चिन्ह पाहायला मिळतं. 2013 मध्ये तिनं अमिश त्रिपाठीच्या शिवा ट्रायलॉजीवरील द ओथ ऑफ द वायुपुत्राचं प्रकाशन केलं होतं.
सर्वात कमी वयात फिल्मफेयरचा निगेटिव्ह रोलचा पुरस्कार मिळवणारी ती पहिली अभिनेत्री आहे. काजलला गुप्त नावाच्या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here