राजापूर ( रत्नागिरी ) – नाणार रिफायनरी प्रकल्पाला सात ते आठ हजार जमीन मालकांची संमतीपत्रे आहे तर, डोंगरतिठा येथे समर्थकांच्या झालेल्या कार्यक्रमाला केवळ सत्तर-ऐशी लोकांची उपस्थिती कशी, असा सवाल शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. लोकांचा विरोध असल्याने शिवसेनेचाही नाणारला विरोध आहे. ही भूमिका अद्यापही बदललेली नाही, हे दाखविण्यासाठी रविवारी (ता.1 मार्च) सागवे येथे शिवसेनेची जाहीर सभा आयोजित केल्याची माहिती कुवळेकर यांनी दिली.
नाणारबाबत शिवसेनेच्या भूमिकेविरोधात सागवे जिल्हा परिषद विभागाने भूमिका घेत नाणारचे जोरदार समर्थन केले आहे. शिवसेनेतर्गंत वाद निर्माण झाले आहेत. त्यातून सेनातर्गंत शह-काटशहाचे राजकारण उफाळून आले आहे. नाणारचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांनी सागवेची कार्यकारिणी बरखास्त करणाऱ्या तालुकाप्रमुखांवरही तोंडसुख घेतले आहे. त्यातून सेनेतर्गंत वाद अधिकच चिघळला. पत्रकार परिषदेमध्ये कुवळेकर यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने सागवेची कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती दिली.
विल्ये ग्रामस्थांच्या समर्थनावर भाष्य करताना विल्ये येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेला उपस्थित असलेल्या 132 पैकी 128 लोकांचा विरोध, तर चार लोकांचे समर्थन असल्याची आकडेवारीही त्यांनी सादर केली. रविवारी (ता.1) सागवे येथे सकाळी 10 वाजता सभा होणार आहे. सभेला खासदार विनायक राऊत, मंत्री उदय सामंत, आमदार साळवी, सुधीर मोरे, विलास चाळके आदी उपस्थित राहणार आहेत.
32 शाखाप्रमुख शिवसेनेसोबत
नाणार रिफायवरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या सागवे येथील पदाधिकाऱ्यांवर संघटनेने कारवाई केली आहे. काहींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कुवळेकर यांनी सांगताना कारवाईचा आकडा सांगण्यास नकार दिला. सागवे कार्यकारिणीतील 45 शाखाप्रमुखांपैकी 22 जणांनी राजीनामे दिले. त्यापैकी सात ते आठ शाखाप्रमुखांनी आम्ही संघटनेसोबत असल्याचे कळविले. त्यामुळे 32 शाखाप्रमुख शिवसेनेसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुवळेकरांवर प्रश्नांची सरबत्ती
नाणार रिफायनरी प्रकल्पाला नक्की विरोध कुणाचा स्थानिक जनतेचा की शिवसेनेचा, रिफायनरीचा मुद्दा संपला, असे जर सेनेकडून सांगितले जात असेल तर 1 मार्चला सागवे येथे सेनेची सभा कशासाठी? शिवसेना पक्षाच्या मुखपत्रात रिफायनरीचे समर्थन करणारी जाहिरात कशी प्रसिद्ध झाली?, रिफायनरी प्रदूषणकारी असेल तर एमआयडीसी प्रदूषित नाही का, आदी प्रश्नांवर कुवळेकर यांना तोंड द्यावे लागले.

News Story Feeds