बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री माधूरी दीक्षितचा गाजलेला चित्रपट ‘हम आपके हैं कौन’ला आज 27 वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटातील सर्व कलाकरांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. चित्रपटामधील गाणी देखील तितकीच लोकप्रिय ठरली. जणून घेऊयात या चित्रपटाबद्दल काही खास गोष्टी…

‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले. या चित्रपटाचे कथानक देखील त्यांनी लिहीले आहे. चित्रपटाचे कथानक लिहायला त्यांना जवळपास 2 वर्ष लागली.
5 ऑगस्ट 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
‘हम आपके है कौन’ हा 100 कोटी कमवणारा पहिला हिंदी चित्रपट आहे.
या चित्रपटाचे बजेट हे 6,25,00,000 रूपये एवढे होते.
प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी या चित्रपटाने 9,50,000 रूपये एवढी कमाई केली. पहिल्या अढवड्यामध्ये या चित्रपटाने 68,00,000 कमाई केली.
चित्रपटामधील सलमान खानने साकारलेली प्रेम या भूमिकेची ऑफर पहिल्यांदा अभिनेता आमिर खानला देण्यात आली होती. पण चित्रपटाचे कथानक आमिरला आवडले नाही त्यामुळे त्याने या चित्रपटाला नकार दिला होता.
चित्रपटाच्या गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. मुझसे जुदा होकार, मौसम का जादू, पेहला पेहला प्यार है, दीदी तेरा देवर दिवाना ही या चित्रपटामधील गाणी प्रेक्षक आजही आवडीने ऐकतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here