ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेऊन जगातील मानाच्या स्पर्धेत देशाचे नाव अभिमाने उंचावण्याच्या इराद्याने प्रत्येक खेळाडू स्पर्धेत सहभागी होत असतो. ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवलेले मेडल हे खेळाडूसाठी अविस्मरणीय क्षणच असतो. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 200 हून अधिक देश सहभागी झाले असून अनेक देशाच्या खात्यात गोल्डचा दुष्काळ दिसतोय. तगडी लढत, संयमी वृत्ती आणि कठोर परिश्रमाच्या संघर्षानंतर सोनेरी क्षण अनुभवण्यासाठी अनेक खेळाडू एका मेडलसाठी झगडत असताना ऑस्ट्रेलियन स्विमरने नवा विक्रम प्रस्थापित करुन दाखवलाय.

ऑस्ट्रेलियन जलपरी इमा मेकॉन (Emma McKeon) ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचलाय. तिने वेगवेगळ्या स्विमिंग प्रकारात तब्बल 7 मेडल पटकावण्याची किमया करुन दाखवली आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियन स्विमिंग टीममधील कायली मेकॉन Kaylee McKeown, इमा मेकॉन (Emma Mckeon) आणि कॅट कॅम्पबेल (Cate Campbell) यांनी 3 मिनिट 51.60 सेकंदात 4×100 मीटर medley relay प्रकारात गोल्डन कामगिरी केलीये.

Also Read: घरची गाय विकून झाला ‘गोली’, PR श्रीजेशच्या यशाची ‘अनटोल्ड स्टोरी’

इमा मॅकन हिने महिला गटातील 100 मीटर फ्रीस्टाइल, 4×100 मीटर फ्रीस्टाइल रिले, 4×100 मीटर मेडले रिले , 50 मीटर फ्रीस्टाइल या चार प्रकारामध्ये गोल्ड मेडल पटकावले आहे. मिक्स्ड स्विमिंग प्रकारातील 4×100 मीटर मेडले रिले, महिला गटातील 100 मीटर बटर फ्लाय इवेंट आणि महिला गटातील 4×200 मीटर फ्रीस्टाइल प्रकारामध्ये तिने कांस्य पदकाची कमाई केलीये.

Also Read: Olympic : हॉकी संघाच्या कर्णधाराला पंतप्रधान मोदींचा कॉल; पाहा VIDEO

27 वर्षीय ऑस्ट्रेलियन महिला स्विमरने आपल्या दिमाखदार कामगिरीने टोकियो ऑलिम्पिकच्या इतिहासात नव्या विश्व विक्रमाची नोंद केलीये. तिने एकाच वेळी दोन दिग्गज महिला खेळाडूंचा विक्रम मागे टाकलाय. यापूर्वी जर्मनीची क्रिस्टिन ओटो हिने 1952 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 6 पदक मिळवली होती. 2008 मध्ये नॅटलीने तिच्या विक्रमाची बरोबरी केली होती. हा विक्रम आता इमाने मागे टाकला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here