गोपैदासच्या कार्यक्रमास चालना मिळावी, यासाठी उच्च वंशावळीच्या देशी वर्गाच्या वळूपासून गोठीत रेत मात्रा तयार करणे व त्याच्या वापरापासून संकरीकरणाचा व संवर्धनाचा उद्देश औरंगाबाद विभागाच्या हर्सूल येथील प्रयोगशाळेत राबवित येत आहे
औरंगाबाद: दूध उत्पादन वाढविण्यासाठी व जातिवंत वळू, बैल, देशी गाईंची पैदास वाढविण्यासाठी औरंगाबाद विभागाच्या हर्सूल येथील अतिशीत रेत प्रयोगशाळेतील दर्जेदार जातिवंत वळूच्या कृत्रिम रेतनाचा पुरवठा राज्यातील १३ जिल्ह्यांना करण्यात येत आहे. प्रयोगशाळेतील गीर, देवणी, खिल्लारी, लाल कंधारी वळू हे शेतकरी व्यावसायिकांना फायदेशीर ठरत आहेत. गोपैदासच्या कार्यक्रमास चालना मिळावी, यासाठी उच्च वंशावळीच्या देशी वर्गाच्या वळूपासून गोठीत रेत मात्रा तयार करणे व त्याच्या वापरापासून संकरीकरणाचा व संवर्धनाचा उद्देश औरंगाबाद विभागाच्या हर्सूल येथील प्रयोगशाळेत राबवित येत आहे.

कृत्रिम रेतनामध्ये उच्चप्रतीच्या देशी वळूचे वीर्य शास्त्रीय पद्धतीने गोळा केले जाते. त्याच्या अनेक चाचण्या घेऊन ते गोठविले जाते. प्रत्येक चाचणीमध्ये सिद्ध ठरलेले वीर्य गावठी व कमी उत्पादन क्षमता असलेल्या गाईच्या गर्भाशयात कृत्रिम पद्धतीने सोडले जाते. या पद्धतीच्या संयोगातून निर्माण होणारी कालवड-वासरे ही चांगल्या प्रतीची व भरपूर दूध उत्पादन देणारी असतात. अशा पद्धतीने उच्च गुणवत्तेची नवीन जात किंवा स्थानिक गाईचे रूपांतर उत्तम दूध देणाऱ्या जातीमध्ये करता येते. यात लाल कंधारी, देवणी, गीर, खिल्लारी या जातीच्या आठ वळूंचे वीर्य संकलनाकरिता जोपासले जाते. त्याचा फायदा मराठवाड्यातील आठ जिल्हे व नाशिक विभागातील पाच जिल्हे असे तेरा जिल्ह्यांना वीर्य मात्राचा पुरवठा करण्यात येतो.

Also Read: औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय मार्गावरील अपघात चिंताजनक
वर्षभरात जवळपास दहा लाख वीर्यमात्रा तयार करण्यात आल्या आहे. यात लाल कंधारी, देवणी, गीर, खिल्लारी वळूंचे पालनपोषण करून त्यांचे दर्जेदार वीर्य घेण्यात येते. मागणीनुसार ते प्रत्येक जिल्ह्यातील कृत्रिम रेतन अधिकारी यांच्याकडे पाठवून तालुक्यातील सरकारी दवाखान्यात देण्यात येते, त्यानंतर दवाखान्यातून गावागावात पशुपालक यांच्या घरी जाऊन व दवाखान्यात कृत्रिम रेतन करण्यात येते. यात ४१ रुपयाला एक वीर्य मात्रा देण्यात येते, असे प्रयोगशाळेतील पशुधन विकास अधिकारी डॉ. सुधीर मठवाले यांनी सांगितले.

-गीर- २४०० ते ३००० (किलोग्राम)
-देवणी – ८०० ते १०००
-खिल्लारी – ३०० ते ५००
-लाल कंधारी – ४०० ते ५००
Also Read: नांदेड जिल्ह्यात डेंग्यूचा प्रसार वाढला; २९ जणांना लागण
– शरीररचनेतील बदल, अनियमित व्यवस्थापन, आनुवंशिकता, प्रजनन अवयवाचे आजार,
मानसिक परिणाम, पशुआहार, मिश्र खनिजाची कमतरता, अपघाताने होणारा गर्भपात.
– वंधत्वावर एकमेव उपाय म्हणजे कृत्रिम रेतन. कृत्रिम रेतनाने काही प्रकारच्या वंधत्वावर नियंत्रण मिळवता येते.
– कृत्रिम रेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूची सिद्धता वीर्य साठवण्याआधीच तपासली जाते व उत्पादन क्षमतेवर भर.
– जनावरे विविध प्रकारचे संसर्गजन्य रोगाला बळी पडत नाही, रोगाचा होणारा संसर्ग टाळता येतो.
– पशुपालकाला गोठ्यात वळूचे संगोपन करण्याची गरज पडत नाही, त्यामुळे देखभालीवर होणारा खर्च कमी होतो.
शेतकरी जो वळू लावतो तो जातिवंत सिद्ध वळू असतो असे नाही. त्याची उत्पादनक्षमता माहिती नसते. परंतु, प्रयोगशाळेत उच्चप्रतीच्या जातिवंत सिद्ध वळूचे वीर्य कृत्रिमरीत्या काढले जाते. तसेच प्रयोगशाळेतील सर्व वळूंना रोगप्रतिबंधक लस दिलेल्या असतात. याचा दूधउत्पादनासाठी फायदा होतो. – डॉ. दत्तात्रय वाघमारे, विभागीय व्यवस्थापक, अतिशीत रेत प्रयोगशाळा.
Esakal