पांढरे केस पुन्हा काळे दिसावेत यासाठी आजकाल अनेक जण हेअर डायचा वापर करतात. हा डाय केसांना लावल्यानंतर साधारणपणे एक-दीड महिना केस छान काळेभोर दिसतात. त्यानंतर तो रंग हळूहळू जाऊ लागतो. मात्र, केसांचा हाच डाय जमिनीवर किंवा कार्पेटवर पडला तर अजिबात जात नाही. कित्येक वर्ष तो तसाच राहतो. म्हणूनच कार्पेटवर पडलेल्या हेअर डायचे डाग कसे काढावेत ते जाणून घेऊयात.
लिंबाचा रस –
कार्पेटवरील हेअर डायचे डाग घालवण्यासाठी लिंबाचा रस बेस्ट ऑप्शन आहे. यासाठी डाग पडलेल्या ठिकाणी लिंबाचा रस २० मिनीटे लावून ठेवावा. त्यानंतर क्लिनिंग ब्रशने डागावर घासून स्वच्छ करावा. जर डाग गडद असेल व एका प्रयत्नात डाग निघत नसेल तर हा उपाय साधारणपणे १ आठवडा करावा.
हायड्रोजन पेरॉक्साइड –
हायड्रोजन पेरॉक्साइमध्ये कापूस भिजून डाग असलेल्या ठिकाणी लावावं. त्यानंतर १० मिनीटांनी डागांवर ब्रशने घासून डाग काढावेत.
सोडिअम थायोसेल्फेट –
कदाचित हे नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल. परंतु, याच्यामुळे हेअर डायचे डाग त्वरीत निघतात. यासाठी दोन कप गरम पाण्यात एक चमचा सोडिअम थायोसल्फेट टाका आणि पाण्यात नीट विरघळून घ्या. त्यानंतर हे पाणी डागांवर टाका व क्लिनिंग ब्रशने साफ करा.
नेलपेंट रिमुव्हर –
हेअर डायचे डाग पडलेल्या ठिकाणी नेलपेंट रिमुव्हर लावावं आणि १५-२० मिनीटांनी पुसून घ्यावं. यामुळे कार्पेटवरील डाग नक्की निघतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here