नागपूर : जेवण, नाश्ता काहीही असो, खाण्याचा अविभाज्य घटक किंवा जेवणाची चव वाढवणारी गोष्ट म्हणजे शेंगदाणे. पोह्यापासून ते जेवणात लागणाऱ्या चटणीपर्यंत शेंगदाण्याचे वर्चस्व असते. शेंगदाण्याला गरिबांचे बदाम देखील म्हणतात. शेंगदाण्यातील घटकांचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल, तर ते रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी खा. भिजलेले शेंगदाणे तुम्ही कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. याच शेंगदाण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे त्यापैकी काही आज आपण जाणून घेऊ या…
शेंगदाण्यात पोटॅशिअम, मँगनीज, तांबे, कॅल्शिअम, लोह, सेलेनियम आदी अनेक पौष्टिक घटक आढळतात.हिवाळ्यात शेंगदाण्याबरोबर गुळाचे सेवन केले तर कंबर आणि सांधे दुखीमध्ये आराम मिळतो.शेंगदाणे मेंदूला शक्ती देतात आणि स्मरणशक्ती वाढवतात.शेंगदाणे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते. तसेच शरीरात ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो.शेंगदाण्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स, लोह, फोलेट, कॅल्शिअम आणि जस्त शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.शेंगदाण्याचे सेवन रक्तातील साखर नियंत्रित करते.