कोल्हापूर : मुलगी जन्माला आली पाहीजे, मुलगी शिकली पाहीजे असा संदेश देत पॉंडिचेरी वरून मोटर सायकलवरून देशभ्रमंतीला (India Tourism) निघालेला रेवंन्त गुराला हा २१ वर्षाचा युवक आज कोल्हापुरात (Kolhapur) आला. जवळपास त्याने ४ हजार किमीचा प्रवास केला असून, २१ राज्यातून काश्मीरच्या लढाखपर्यंतची (Kashmir Ladakh) भ्रमन्ती पूर्ण झाल्याची माहिती रेवंन्तने दिली. तसेच विश्व विक्रम करण्याचा मनोदयही त्याने दै. सकाळशी बोलताना व्यक्त केला.
रेवंन्त सर्वसामान्य कुटूंबातील आहे. वडील शासकीय कर्मचारी आहेत. आई सेवा निवृत्त आहे. त्याने बीबीएचे शिक्षण घेतल्यानंतर आयुष्यात काही तरी वेगळ करायचा उद्देश ठेवला. देशातील अनेक राज्यात मुलीचा जन्म दर कमी आहे. त्याबरोबर महिला शिकल्या तर कुटूंबाची पर्यायाने देशाची प्रगती होईल असे उद्दिष्ट घेऊन देशभ्रमन्ती करण्याचे निश्चित केले.
देशातील अनेक राज्यात मुलीचा जन्म दर कमी आहे. त्याबरोबर महिला शिकल्या तर कुटूंबाची पर्यायाने देशाची प्रगती होईल असे उद्दिष्ट घेऊन देशभ्रमन्ती करण्याचे निश्चित केले.

२७ फेब्रवारीला २०२० ला त्याने जंम्बो मोटर सायकलवरून प्रवासाला सुरवात केली. दिवसाला ३०० ते ७०० किमीचा प्रवास करीत तो पूर्वांचलमध्ये गेला. तिथे अनेक राज्यात त्यांचे कौतुक झाले. मात्र याच वेळी कोरोना सुरू झाला. काही ठिकाणी परराज्यातील माणूस आला म्हणून त्याला लोकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. मात्र स्थानीक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, पोलिसांनी त्याला इतर राज्यापर्यंत सुखरूप पोहचवले. तेथून पुढे तो बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश मार्गे तो जम्मू काश्मीर मधील लढाख पर्यंत पोहचला तेथे बर्फाळ प्रदेशातील रस्त्यावर त्याचा अपघात झाला.
Also Read: महापुराच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार
सुदैवाने तो बचावला. तेथे अनेक लोकांनी मदत केली. मी सुखरूप परतलो असे अनुभव रेवन्त याने सांगितले. त्यानंतर दिल्ली, राजस्थान, गुजरात मार्गे महाराष्ट्रात आला. कोल्हापूर एेतिहासीक, धार्मिक शहर आहे. मला इथे आल्यानंतर आनंद वाटला. येथील लोक बोलके आहेत. माझ्या या मोहीमेबद्दल कौतुक अनेकांनी केले. गोवा मार्गे कन्याकुमारी पर्यंत तेथून पुढे पॉंडिचेरी पर्यंत जाणार असल्याचे रेवन्त याने सांगितले.

कभी खुशी कभी गमचा अनुभव
या संपुर्ण प्रवासात अनेक लोक भेटले, काहीने कौतुक जरूर केले. मात्र कशाला वेळ पैसे वाया घालवतोस. किंवा काय मिळणार या प्रवासातून असे टोमणे मारत नाउमेदही केले. या उलट अनेक राज्यात विशेषतः उत्तर भारतात अनेक गावात अनेक लोकांनी जेवण दिले. निवासाची सुविधाही केली. परिणामी स्वखर्चाची बचत होऊ शकली. त्यामुळे पुढील प्रवास सुखकर होत गेला असेही अनुभव रेवंन्त याने सांगितला.
Esakal