जेम्स अँडरसनने आधी पुजारा आणि नंतर विराटला माघारी धाडलं

Ind vs Eng 1st Test: भारतीय संघाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांत गुंडाळला. त्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनी ९७ धावांची सलामी दिली. राहुलने जोरदार अर्धशतक ठोकले. रोहितला मात्र ३६ धावांवर माघारी जावे लागले. त्यानंतर इंग्लंडचा ‘स्विंगमास्टर’ जेम्स अँडरसन गोलंदाजीला आला आणि त्याने दोन चेंडूत भारताचे दोन तगडे खेळाडू माघारी धाडले. त्याचसोबतच त्याने भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळे याच्या भव्यदिव्य विक्रमाशी बरोबरी केली.

Also Read: पहिला बॉल ट्रायल असतो यार.. चाहत्यांकडून विराट भन्नाट ट्रोल

जेम्स अँडरसनने घरच्या मैदानावर चेंडू स्विंग करायला सुरूवात केली. त्याच्या स्विंगचा चेतेश्वर पुजारा अजिबातच अंदाज आला नाही. तो कमी उसळलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने १६ चेंडूत ४ धावा केल्या. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली काय कमाल करतो याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. पण विराटला काहीही करता आलं नाही. पहिल्याच चेंडूवर बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट लावून विराट झेलबाद झाला. या विकेटसह अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ गडींचा टप्पा गाठला. त्यासोबतच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेशी बरोबरी केली.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी

Also Read: रोहित-राहुल जोडीची धमाल; १० वर्षांत पहिल्यांदाच केली कमाल!

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here