डोंबिवली – बिल न भरल्यास धडक कारवाई करण्याचा सपाटा महावितरणने लावला असून यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेलाही सूट मिळाली नाही. महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या लाल चौकी येथील सिग्नल यंत्रणेचे 138 दिवस झाले तरी केडीएमसीने बिल न भरल्याने महावितरणने येथील सिग्नलची वीज कापली आहे. (Mumbai News)

कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महत्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेतील वर्दळीचा रस्ता असणाऱ्या लालचौकी परिसरातही सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे.

या सिग्नलचे 138 दिवसांचे 7 हजाराचे बिल शिल्लक आहे. बिल भरणा झाला नसल्याने महावितरणने लाल चौकीच्या सिग्नलचा वीज पुरवठा खंडित केला आहे. यामुळे ही सिग्नल यंत्रणा सध्या बंद आहे.

Also Read: पिंपरी-चिंचवड शहरात आज २१६ नवीन रुग्ण

महावितरण कल्याण पश्चिम विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 138 दिवसांचे 7 हजाराचे बिल बाकी आहे. यामुळे लाल चौकी येथील सिग्नलचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. बिल शिल्लक असल्याची कल्पना पालिका प्रशासनास दिली होती का? यावर 138 दिवस झाले बिल पेंडिंग असल्याने आम्ही कारवाई केल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले. याविषयी पालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here