महिला हॉकी गटातील साखळी सामन्यात ज्या ग्रेट ब्रिटनने ऑयर्लंडला पराभूत करत भारतीय महिला संघासाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडण्यात हातभार लावला त्या ब्रिटनसोबत भारतीय कांस्य पदकाच्या लढतीसाठी भारतीय महिला संघ मैदानात उतरलाय. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात सर्वोच्च कामगिरी नोंदवणारा भारतीय महिला हॉकी संघ पदकी सामन्यात कसा खेळ दाखवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कुस्तीमध्ये पुरुष गटात बजरंग पुनिया तर महिला गटात सीमा बिस्ला आखाड्यात उतरणार आहे.
सेमी फायनलमध्ये अर्जेंटिना विरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता पदक निश्चित करण्याची त्यांच्याकडे शेवटची संधी आहे.
क्वार्टर फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 1-0 अशा फरकाने नमवत भारतीय महिलांनी आपल्यातील सर्वोत्तम कामगिरीची झलक दाखवून दिली.

साखळी सामन्यातील सलग तीन सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडला शह देत भारतीय महिला हॉकी संघाने बाद फेरीत प्रवेश केला.
ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिला संघाने यंदाच्या स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी नोंदवलीये
Esakal