त्यांच्या या दौऱ्याची कसलीही कल्पना तालुक्यातील अधिकाऱ्यांना व उपळाई बुद्रूक येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना नसल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली.

उपळाई बुद्रूक (सोलापूर): प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नेमका कसा चालतो हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक उपळाई बुद्रूक (ता.माढा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. त्यांच्या या दौऱ्याची कसलीही कल्पना तालुक्यातील अधिकाऱ्यांना व उपळाई बुद्रूक येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना नसल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली.

Also Read: उपळाई बुद्रूक येथून मुलाच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न

जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर हे माढा दौऱ्यावर असताना अचानकपणे त्यांनी माढ्यातून गाड्यांचा ताफा घेऊन उपळाई बुद्रुक आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी आरोग्य केंद्राची दप्तर तपासणी, कोरोना परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी प्रसूतिगृह, प्रयोगशाळा व कोरोना लसीकरण, डाटा एन्ट्री या खोल्यांची स्वतःहून जाऊन पाहणी केली. यावेळी गावातील नागरिकांनी आरोग्य केंद्राच्या बाबतीत असलेल्या समस्या मांडल्या. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना समस्यांचे निराकरण करण्यासाठी सूचना दिल्या. जवळपास दोन तासाच्या आसपास जिल्हाधिकारी शंभरकर हे आरोग्य केंद्रात हजर होते. यावेळी येथील कामाबाबत समाधानकारक वाटत नसल्याने, सर्वासमक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच कोरोना चाचणी वाढविण्यासंदर्भात सुचना केल्या.

Also Read: उपळाई बुद्रूकच्या जंगलाला आग ! दोनशे एकर परिसर बाधित; आमदार शिंदेंच्या तत्परतेमुळे विझला वणवा

यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव, डॉ. अमोल शिंदे, डॉ. धनराज कदम यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

Also Read: बेभरवशाची नोकरी सोडून उपळाई येथील तरुण कमावतोय गांडूळ खत निर्मितीतून महिन्याला लाखो रुपये !

जिल्हाधिकारी आरोग्य केंद्रात बसले अंधारात…

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक उपळाई आरोग्य केंद्रात आले असता. वैद्यकीय अधिकारी यांच्या कक्षात लाईट नसल्याने बराच वेळ ते अंधारात बसले होते.

Also Read: बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा

जिल्हाधिकारी आधी त्यानंतर तालुक्यातील अधिकारी पोहचले.

जिल्हाधिकारी शंभरकर हे स्वतः आरोग्य केंद्रात पोहोचल्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांची धावपळ उडाली, प्रथम तहसीलदार नंतर प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी आले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here