अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या मालदीवमध्ये पती कुणाल बेनोडेकरसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय.
कँडिमा मालदिव्स या ठिकाणी हे दोघं थांबले असून तिथले फोटो आणि व्हिडीओ सोनाली तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर पोस्ट करत आहे. कुणालच्या वाढदिवसानिमित्त हे दोघं मालदीवला फिरायला गेले आहेत. निसर्गरम्य ठिकाणी सोनाली-कुणालची डिनर-डेट इन्फिनिटी पूलमध्ये फ्लोटिंग लंचचा आस्वाद घेताना सोनाली मालदीवच्या समुद्रातील डॉल्फिन पाहण्याचा मनमुराद आनंदही या दोघांनी घेतला. सोनालीच्या बिकिनीतील फोटोंनी नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधले. कुणालच्या हातात हात देऊन सोनालीने हा रोमँटिक फोटो पोस्ट केला. सोनालीने ७ मे २०२१ रोजी दुबईत कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांनी लग्न केलं.