आधुनिक जगातला श्रावणबाळ असल्याचा प्रत्यय आणि अनुभव खानदेशवाशीयांना आला
.
गणपूर(ता चोपडा): कलियुगात काय ऐकायला मिळेल ,हे सांगणे तसे कठीण, गावोगावी मंदिरेही आपण खूप पाहतो पण नव्वदी पार करून या जगाचा निरोप घेऊन गेलेल्या आई वडिलांचे (Mother and father) स्मृती मंदिर (Memorial Temple) बांधून तीन हजार लोकांना भोजन देणारा आधुनिक जगातला श्रावणबाळ असल्याचा प्रत्यय आणि अनुभव खानदेशवाशीयांना गुरूवारी आला.

वृद्धाश्रमात श्रीमंतांसह अनेकांचे आई वडील राहत असल्याचे अनुभव काही नवीन नाहीत.पण जिवंतपणी सेवा केलीच परंतु मृत्यू पच्छातही आई वडिलांच्या पायाजवळ बसता यावे म्हणून कुसुम्बे (ता चोपडा) येथील 45 वर्षीय राजेश्वर उर्फ बाळू रतन पटेल यांनी आपल्या कुसुम्बे ते वढोदा रस्त्यालगतच्या शेतात सुंदर असे “आई वडिलांचे स्मृती मंदिर” बांधले असून त्यांच्या पायाजवळ बसता यावे म्हणून पादुका ठेऊन त्याखाली बसण्याची सोय केली आहे.

त्यांचे दत्तक वडील रतन पंडित पटेल यांचे 94 वर्षे वयात 11 महिन्यांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले ,आणि 80 वर्षीय आई शकुंतला रतन पटेल अवघ्या सात दिवसाचे अंतराने वारली. शेतकरी कुटुंबातील असलेल्या राजेश्वर पटेल यांचे हे कार्य पाहून तरी आई वडिलांना वागवण्याची आधुनिक काळातील मुलांची मनोधारणा व्हावी हा दृष्टिकोन असल्याची भावना त्यांनी ‘सकाळ’शी बोलतांना व्यक्त केली.
Esakal