टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने सर्वोच्च कामगिरीची नोंद केली. ब्राँझ मेडलसाठीच्या सामन्यात त्यांच्यासमोर गत ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट ग्रेट ब्रिटनचे आव्हान होते.
पहिल्या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनने आपला धमाका दाखवला आणि भारतीय महिला संघाला 2-0 असे पिछाडीवर टाकले. पण दुसऱ्या क्वार्टमध्ये भारतीय महिला संघाने आपल्यातील ताकद दाखवून दिली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय महिला संघाने तीन गोल डागले. आणि ग्रेट ब्रिटन महिला संघाटे टेन्शन वाढवले.अखेरच्या क्वार्टरमधील गोलच्या जोरावर ग्रेट ब्रिटनने 4-3 असा विजय नोंदवत ब्राँझ पदकावर नाव कोरले.
महिला कांस्य पदक ब्रिटनकडून ४-३ ने गमावल्यानंतर भारताच्या राणीला मैदानातच रडून कोसळले
ग्रेट ब्रिटनच्या आक्रमण लिलया पेलणाऱ्या सविता पुनियाला मैदानातच रडू कोसळले. तिच्याशिवाय इतर महिला खेळाडूंनाही पराभवानंतर अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू भारतीय महिला खेळाडूंचे सांत्वन करतानाचे चित्रही दिसले.
ग्रेट ब्रिटन विरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाने दमदार खेळ दाखवला.

भारतीय पुरुष संघात श्रीजेशनं ज्याप्रमाणे भारताची भिंत बनून प्रतिस्पर्धी संघाचे इरादने हाणून पाडले अगदी तसाच तोरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला संघाची गोलकीपर सविता पुनियानेही दाखवून दिला

48 व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनने पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये बदलून सामन्याला कलाटणी दिली. सविता पुनियाने तिच्यापरिने सर्व प्रयत्न केले. पण ते अपूरे पडले. हा गोल जर झाला नसता तर भारतीय महिला संघाने सामना पेनल्टी शूट आउटपर्यंत नेला असता. कदाचित सामन्याचे चित्रही बदलले असते.
बाँझ मेडलच्या सामन्यात भारतीय संघाला अपयश आले असले तरी ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वोच्च कामगिरी करुन संघ मायदेशी परतेल.
पॅरिसमध्ये होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघाचा हा तोरा आणखी रुबाबदार दिसेल, अशी आस निश्चितच निर्माण झालीये.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here