सौभाग्यलंकार मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राची ‘फॅशन’ नवनवीन रुपानं महिलांपुढे येत आहे. हल्ली मंगळसूत्राचं ब्रेसलेट आणि अँकलेटसुद्धा ट्रेंडमध्ये आहेत. त्यातही बॉलिवूड किंवा मराठी सेलिब्रिटींनी घातलेल्या मंगळसूत्रांच्या डिझाइनची चर्चा फॅशनप्रेमींमध्ये चांगलीच रंगते. मराठी मालिका किंवा चित्रपटांमधल्या नायिकांचं मंगळसूत्र हा बाजारपेठेतला ट्रेंड ठरतो. ‘सौभाग्य लेण्यांचा’ हा मॉडर्न ट्रेंड सध्या बाजारात हिट आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी Sonalee Kulkarni सध्या पती कुणाल बेनोडेकरसोबत Kunal Benodekar मालदीवमध्ये सुट्टयांचा आनंद लुटतेय. मालदीवच्या निसर्गरम्य ठिकाणावरील काही फोटो सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. एकीकडे या फोटोंमधील सोनालीच्या कपड्यांच्या फॅशनची चर्चा तर होतच आहे, पण दुसरीकडे सोनालीच्या गळ्यातील ट्रेंडी मंगळसूत्राने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

साडी किंवा पंजाबी ड्रेसवरच मंगळसूत्र शोभून दिसतं, असं अनेकांचं मत असतं. किंवा मॉडर्न, स्टायलिश कपडे घातल्यावर त्याला शोभून दिसणारे मॉडर्न डिझाइनचेच मंगळसूत्र वापरण्यावर स्त्रियांचा भर असतो. काही स्त्रिया अशा वेळी गळ्यात मंगळसूत्र घालणं टाळतात. पण सोनालीने तिच्या कपड्यांच्या फॅशननुसार विविध मंगळसूत्रांची निवड केली आहे.

Also Read: सोनाली कुलकर्णीची मालदीवमध्ये पतीसोबत धमाल

Also Read: ‘झी मराठीने खूपच मनावर घेतलेलं दिसतंय’; नव्या मालिकांवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

सोनालीने लाल रंगाच्या कपड्यांवर सिल्वर चेन मंगळसूत्र तर काळ्या रंगाच्या कपड्यांवर सिल्वर पर्ल मंगळसूत्र परिधान केले आहे. मालदीवहून इन्स्टा लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना अनेक नेटकऱ्यांचं लक्ष सोनालीच्या मंगळसूत्राने वेधलं होतं. “मला साध्या आणि तितक्याच ट्रेंडी डिझाइनचं मंगळसूत्र हवं होतं. म्हणून मी आद्या या ब्रँडकडून या मंगळसूत्राची निवड केली”, असं तिने यावेळी चाहत्यांना सांगितलं.

सोनालीने ७ मे रोजी दुबईत कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांनी लग्नगाठ बांधली. कुणालच्या वाढदिवसानिमित्त सध्या हे दोघं मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here