मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी प्रयागराज येथे झाला.त्यांचा जन्म दिवस हा देशात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.ध्यानचंद वयाच्या 16 व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती झाले.ड्युटीनंतर ते चांदण्याच्या प्रकाशात हॉकीचा सराव करायचे, म्हणून त्याला ध्यानचंद म्हटले जाऊ लागले.त्याच्या खेळामुळे भारताने 1928, 1932 आणि 1936 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके जिंकली.1928 च्या अॅमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 14 गोल केले होते. मग एका स्थानिक वृत्तपत्राने लिहिले, ‘ती जादू होती, हॉकी नाही आणि ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार आहेत.’ तेव्हापासून त्यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाऊ लागले.