‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील ओम आणि स्वीटू या व्यक्तिरेखांसोबतच इतर व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. त्यातील एक जवळची वाटणारी व्यक्तिरेखा म्हणजे चिन्या.

चिन्यासारखा भाऊ हवा असं त्याच्या भूमिकेकडे बघून अनेकांना वाटतं. अभिनेता अर्णव राजे ही भूमिका अत्यंत चोख साकारतोय.
‘मला अभिनयाची गोडी लहानपणापासूनच लागली होती. माझे वडील अभिनय क्षेत्रात असल्यामुळे अभिनयाचं बाळकडू लहानपणापासूनच मिळालं आहे. त्यांनी दिलेलं प्रोत्साहन माझ्यासाठी खूप मोलाचं आहे,’ असं तो सांगतो.
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर सुवर्ण राणे यांनी अर्णवचं एकांकिकेतील काम पाहिलं होतं. त्यामुळे त्याला मालिकेत चिन्याची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
अर्णव आणि चिन्यामध्ये किती साम्य आहे असा प्रश्न विचारला असता, तो म्हणतो, “मला सर्वजण म्हणतात की मी चिन्यासारखाच आहे. पण खऱ्या आयुष्यात मी चिन्याच्या अगदी उलट स्वभावाचा आहे. त्यामुळे हे पात्र साकारताना मला बरीच मेहनत घ्यावी लागली.”
“अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे ओळख मिळाली. चिन्यामुळे मी घराघरात पोहोचलो. माझ्या कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळे मला ऊर्जा मिळते. त्यांच्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकलो. याच संपूर्ण श्रेय माझ्या कुटुंबाला आणि गुरूंना मी देतो,” असं तो म्हणतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here