बॉलीवूडमध्ये bollywood अशा काही अभिनेत्री actress आहेत ज्यांनी आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्यात अभिनेत्री रेखा rekha यांचं नाव घेता येईल. वयाची साठी ओलांडली तरीही त्यांचं दिसणं हे प्रेक्षकांना थक्क करणारं आहे. रेखाजी या सोशल मीडियावर social media अॅक्टिव्ह असणाऱ्या सेलिब्रेटी आहेत. त्यांच्याबदद्ल जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आहेत तेवढ्या खचितच दुसऱ्या एखाद्या अभिनेत्रीबद्दल असतील. अजूनही रेखाजी अनेक रियॅलिटी शो मध्ये हजेरी लावतात. नवोदित कलाकारांना प्रेरित करत असतात.

‘गुम है किसी के प्यार में’ आजपर्यंतचा सर्वात लोकप्रिय टेलीविजन शो आहे आणि जेव्हा अभिनेत्री रेखाने या सीरियलसाठी आपला पहिला प्रोमो शूट केले, तेव्हापासून तर या शोबाबतची उत्सुकता अनेक पटींनी वाढली आहे.
चाहते रेखा यांना टेलीविजन स्क्रीनवर पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मालिकेच्या निर्मात्यांनी आपल्या चाहत्यांना नवीन प्रोमोने सरप्राइज देण्याचा निर्णय घेतला.
त्या प्रोमोसाठी त्यांनी सौंदर्यवती रेखाजी यांच्या नावाचा विचार केला. जो आपल्या उत्कट भावनांचे तितकेच योग्य चित्रण करून या दिलखेचक प्रोमोला न्याय देणाऱी अभिनेत्री कोण असा प्रश्न जेव्हा आला तेव्हा शकले असते?
प्रोमो मंत्रमुग्ध करणारा असून रेखा यांच्या मधुर आवाजात साई और विराट यांच्या जीवनाची कहाणी ऐकल्यानंतर, आपण हे पाहण्यासाठी उत्सुक होतो की पुढे काय होणार आहे?

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here