अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती स्फोटक बनली आहे. अफगाणिस्तान सैन्य आणि तालिबानच्या दहशतवाद्यांमध्ये दररोज भीषण चकमकी होत आहेत. शुक्रवारी तब्बल ३०३ तालिबान्यांचा खात्मा करण्यात आला होता.

लंडन- अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती स्फोटक बनली आहे. अफगाणिस्तान सैन्य आणि तालिबानच्या दहशतवाद्यांमध्ये दररोज भीषण चकमकी होत आहेत. शुक्रवारी तब्बल ३०३ तालिबान्यांचा खात्मा करण्यात आला होता. तालिबानीही प्रतिकार करत आहेत. सैन्य आणि सर्वसामान्य नागरिकांना तालिबान्यांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनने आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानमधून परत येण्याचे निर्देश दिले आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थिती असुरक्षित झाली आहे, त्यामुळे नागरिकांनी देश सोडावा असं यूकेने म्हटलं आहे. (International Afganistan Latest News)

ब्रिटन सरकारने अफगाणिस्तान प्रवासासाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ब्रिटिश नागरिकांना अफगाणिस्तान सोडण्याचा सल्ला आहे. देशातील सुरक्षा स्थिती बिकट बनली आहे. ब्रिटिश नागरिकांनी तात्काळ दुतावासाशी संपर्क साधावा आणि आपली निघण्याची योजना सांगावी. दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये कारवाया वाढवण्याची शक्यता आहे. यूरोपीय नागरिकांसाठी धोका वाढला आहे. अपहरणांच्या घटना घडू शकतात, असं ब्रिटिनने पत्रकात म्हटलं आहे.

Also Read: भारताने लसीकरणात ओलांडला 50 कोटींचा टप्पा

शुक्रवारी तालिबानने अफगाणिस्तान प्रसारमाध्यम केंद्राच्या संचालकाची हत्या केलीये. काही दिवसांपूर्वी कार्यकारी संरक्षण मंत्र्यांच्या घरावर हल्ला केला होता. सुदैवाने ते घरात नसल्याने थोडक्यात बचावले. अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा केल्यापासून तालिबानने आक्रमकता दाखवली आहे. तालिबान्यांनी नागरिक, अफगान सैन्यांवर हल्ले वाढवले आहेत. ताबिलानने अफगाणिस्तानमधील मोठ्या भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. येत्या काळात देशातील परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे.

Afganistan Army

अफगाणिस्तानमध्ये एकामागून एक शहरे ताब्यात घेणाऱ्या तालिबानने निमरोझ प्रांताची राजधानी झारंज या शहरावरही वर्चस्व मिळविल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. तालिबानच्या ताब्यात जाणारे हे पहिले राजधानीचे शहर आहे. या शहरातील विमानतळावरही तालिबानने ताबा मिळविला आहे. या महिनाअखेरपर्यंत अमेरिका आणि नाटो देशांचे सैन्य पूर्णपणे माघारी जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर तालिबानवर वचक ठेवणे सरकारला अवघड जात आहे.

Afganistan

अफगाणिस्तानच्या प्रसारमाध्यम केंद्राच्या संचालकांची हत्या

अफगाणिस्तान सरकारच्या प्रसारमाध्यम केंद्राचे संचालक दवा खान मेनापाल यांच्‍यावर शुक्रवारी गोळ्या झाडून तालिबानने हत्या केली. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद यानेच ही माहिती दिली. ‘ सरकारचा प्रसिद्धी विभाग सांभाळणारे मेनापाल यांना आमच्या योद्ध्यांनी ठार केले आहे. अफगाण सरकारच्यावतीने प्रसिद्ध होणारी माहिती स्थानिक व परराष्ट्र प्रसारमाध्यमांना देण्‍याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मुजाहिदीनने हल्ला करून मेनापाल यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली, असे मुजाहिदने सांगितले, मात्र अधिक माहिती दिली नाही. शुक्रवारची प्रार्थना सुरू असताना गोळीबार झाला, असे गृह मंत्रालयाचे उपप्रवक्ते हमीद रुशान यांनी सांगितले. अफगाणिस्तानच्या हंगामी संरक्षण मंत्र्यांना लक्ष करीत तालिबान्यांनी मंगळवारी (ता. ३) बाँबहल्ला केला होता. त्यातून ते सुदैवाने बचावले

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here