पुणे : शहरातील निर्बंध कमी करायचे असतील, तर महापालिकेने (pune corporation) प्रस्ताव द्यावा, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी सांगितलेले असतानाही महापालिका आयुक्त विक्रम कुमार (vikram kumar) यांनी त्या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला अद्याप सादर केलेला नाही. दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवावी, अशी मागणी महापालिकेतील सत्ताधारी भाजप (Bjp) करीत असतानाच, आयुक्तांनी मात्र वेगळा सूर लावला आहे. परिणामी नागरिक संतप्त झाले आहेत. (pune corporation commissioner denial reduce restrictions)

पुण्यातील कोरोनाचा रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट गेल्या तीन आठवड्यांपासून साडेतीन टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील निर्बंध शिथिल होऊ शकतात. परंतु, त्याबाबत महापालिकेने प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे. परंतु, आयुक्त विक्रमकुमार यांनी अद्याप प्रस्ताव पाठविलेला नाही. पुण्यातील व्यावसायिक, हॉटेलचालक गेल्या तीन दिवसांपासून सायंकाळी चारनंतर व्यवसाय सुरू ठेवत आहेत. पोलिस त्यांच्यावर कारवाई करीत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेची भूमिका आश्चर्याची ठरली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here