कऱ्हाड (सातारा) : कोयना धरण (Koyna Dam) आणि भूकंपाची (Earthquake) नेहमीच चर्चा होते. अनेक मतप्रवाही आहेत. दहा वर्षांत कोयना खोऱ्यातील (Koyna Valley) भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्याकडे (Warna Valley) सरकला आहे. अलीकडे १०० हून अधिक मध्यम व तीव भूकंपांच्या धक्क्यातील निम्म्याहून अधिक भूकंपांचा केंद्रबिंदू कोयनाऐवजी वारणा खोरे आहे, अशी संशोधकांकडे नोंद आहे. कोयनेतून वारणा खोऱ्याकडे सरकणाऱ्या केंद्रबिंदूचा हैदराबाद येथील राष्ट्रीय भौगोलिक संशोधन संस्था (National Institute of Geographical Research) सध्या अभ्यास करत आहे. भूगर्भात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, त्यांचे संशोधन होताना भूस्खलनाचा (Landslide) त्यात अभ्यास होणार आहे.
कोयना व वारणा खोऱ्यात कोयना धरण होण्यापूर्वीही भूकंप झाल्याचे सांगितले जाते.
कोयना व वारणा खोऱ्यात कोयना धरण होण्यापूर्वीही भूकंप झाल्याचे सांगितले जाते. कोयना धरण झाल्यापासून कोयनेत भूकंप संशोधन व मापक केंद्र झाले. त्यामुळे ५७ वर्षांतील भूकंपाच्या नोंदी येथे आहेत. ५७ वर्षांत तब्बल एक लाख २१ हजार १३७ भूकंपांची नोंद आहे. तीन रिश्टर स्केलच्या आतील एक लाख १९ हजार ३७३, सौम्य धक्के म्हणजेच चार रिश्टर स्केलच्या आतील एक हजार ६५९ भूकपांचे धक्के बसले आहेत. पाच रिश्टर स्केलपर्यंतच्या ९६ तर त्याहीपेक्षा जास्त नऊ भूकंपांची नोंदही आहे. दहा वर्षांत झालेल्या भूकंपांच्या धक्क्यांचा केंद्रबिंदू कोयनाऐवजी वारणा खोऱ्याकडे सरकला आहे. दहा वर्षांत तब्बल तीन हजार ११० भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात २०१२ मध्ये सर्वाधिक एक हजार १४० तर २०१६ मध्ये सर्वांत कमी अवघे २७ भूकंपांचे धक्के बसले आहेत.
Also Read: Koyna Dam : कोयनेत 65 दिवसांत 105.2 TMC ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाणीसाठा
भूगर्भातील हालचालींचा व वारणा खोऱ्याकडे सरकणाऱ्या भूंकपाच्या केंद्रबिंदूचा हैदराबादच्या राष्ट्रीय भौगोलिक संशोधन संस्थेतर्फे अभ्यास सुरू आहे. त्यासाठी खास संशोधकांची नेमणूक आहे. कोयना परिसरातील भूस्खलनाबाबतही अभ्यास होण्याची शक्यता आहे. कोयनेतील भूकंपमापन केंद्रातर्फे ३२ चौरस किलोमीटरच्या परिसरातील भूकंपाची नोंद होते. त्यानुसार अलीकडच्या १०० भूकंपांच्या नोंदीनुसार वारणा खोऱ्याकडे सरकणारा केंद्रबिंदू त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनीही त्याचा अहवाल शासनाला दिला. त्यानुसार संशोधन सुरू आहे.

Also Read: सनसनीखेज आरोप करण्यापलिकडं चित्रा वाघांना काही येतं?
वारणा खोऱ्याकडे सरकणाऱ्या भूकंपाच्या केंद्रबिंदूचा अभ्यास राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. कोयना खोऱ्यातील भूकंपाचा केंद्रबिंदू दहा वर्षांपासून वारणा खोऱ्याकडे सरकला आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास व निरीक्षणांची गरज आहे.
-पी. बी. जाधव, सहायक संशोधक, कोयना
Also Read: भूस्खलनग्रस्त गावांचे भूगर्भतज्ञांकडून होणार सर्वेक्षण
…असे आहेत वारणा व कोयना खोऱ्यातील दहा वर्षांतील भूकंपाचे धक्के
(माहिती सरासरीत आहे.)
वर्ष – एकूण भूकंप वारणा खोरे कोयना खोरे
-
२०११ – ६१८ ३७१ २४७
-
२०१२ – ११४० ६८४ ४५६
-
२०१३ – ४०३ २४२ १६१
-
२०१४ – ४०२ २४१ १६१
-
२०१५ – २५३ १५२ १०१
-
२०१६ – २७ १६ ११
-
२०१७ – ३५ २२ १३
-
२०१८ – ४० २३ १७
-
२०१९- ४४ २६ १८
-
२०२०- १४८ ८८ ६०
Esakal