राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्रने गुड न्यूज दिली आहे. सावनी आणि तिचा पती डॉ. आशिष धांडे यांना कन्यारत्र प्राप्त झाले आहे.

मे महिन्यात सावनीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली होती.
‘’माझ्या मनात सध्या खूप अलौकीक भावना आहेत. ज्या मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आजवर मी गायिका म्हणून आईपणावर वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. अंगाई गीत, डोहाळ जेवणाचे गीत, बारश्याची गाणी मी या आधी गायली होती. पण आता मी स्वत: त्या भूमिकेत जाणार आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे,” अशी पोस्ट तिने लिहिली होती.
येणाऱ्या बाळाला तिने लकी चार्म म्हटलं होतं. “माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझिक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्ट्स शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली. काही गाणी लवकरच रिलीज होतील’’, असं तिने सांगितलं होतं.
२०१८ मध्ये सावनीने आशिष धांडेशी लग्नगाठ बांधली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here