अकोले (जि.अहमदनगर) : आदिवासी विकास परिषद व आदिवासी संघटनांनी एकत्र येत भंडारदरा (bhandardara dam) येथील विल्सन जलाशयाचे नाव आता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या (ता.९) क्रांती दिनी हा कार्यक्रम पार पडणार असून याबाबतची माहिती आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विजय भांगरे यांनी दिली. मात्र या नव्या नावाबाबत सध्या नागरिकांमध्ये उत्सुकता आहे
ठरलं ‘हे’ नाव!
भाजपचे राष्ट्रीय मंत्री तथा आदिवासी विकास परिषदेचे राज्याध्यक्ष आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भंडारदरा जलाशयावर हजारो तरुण एकत्र येऊन विल्सन जलाशयाला ‘क्रांतिवीर राघोजी भांगरे’ हे नाव देण्यात येणार आहेत. याबाबत राज्य व केंद्र सरकारला पत्रव्यवहार केल्याचे संयोजकांनी सांगितले. वैभव पिचड म्हणले की, जल, जंगल, जमीन हे आदिवासी समाजाचे हक्काचे असून आद्यक्रांतीची मशाल ज्यांनी पेटविली आणि सर्वसामान्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी तसेच होणारे शोषण थांबविण्यासाठी ज्यांनी मोठा लढा उभारला अशा आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचे नाव विल्सन डॅमला देण्यात येणार आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी विल्सन डॅमचे ‘आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे धरण’ असे नामकरण होत आहे.

माजी मंत्री मधुकर पिचड (madhukar pichad) यांच्या प्रेरणेने आदिवासी विकास परिषद व आदिवासी संघटनांनी एकत्र येत भंडारदरा येथील विल्सन जलाशयाचे नाव आता क्रांतिवीर राघोजी भांगरे असे होणार आहे. येत्या (९ ऑगस्ट) क्रांती दिनी हा कार्यक्रम येथे होत आहे, अशी माहिती आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विजय भांगरे यांनी दिली.
Also Read: अहमदनगर : सुशिक्षितांमध्येच ‘एचआयव्ही’चा टक्का वाढता
Also Read: ‘आमदार लंकेंकडून मारहाण नाही’, राहुल पाटलांचे म्हणणे; पोलिसांकडे मात्र तक्रार
Esakal