इथल्या वैशिष्ट्यपूर्ण भूरचनेमुळे या स्थानाला मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते

उस्मानाबादच्या उत्तरेस 22 कि. मी. अंतरावर सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गालगत येडशी रेल्वे स्थानकाजवळ रामलिंग हे देवस्थान आहे.
इथल्या वैशिष्ट्यपूर्ण भूरचनेमुळे या स्थानाला मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते
सात ते आठ ग्रामसमुहामध्ये असलेल्या दरीत एका सखल भागात रामलिंग देवस्थान आहे
या स्थानाविषयी काही आख्यायिका प्रचलीत असून प्रभू रामचंद्रांनी येथील शिवलिंगाची पुजा केली अशी मान्यता आहे
येथे पावसाळ्यात असलेला धबधबा, परिसरातील घनदाट जंगलील वनामुळे अनेक प्राणी व पक्षी वावरताना दिसतात
पावसाळ्यात या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात
येडशी-रामलिंग घाट हे अभयारण्याचे क्षेत्र घोषीत केले आहे
येथे रामलिंग मंदिर आणि दुर्गादेवी ही दोन मंदिरे असून खाली खोल दरी व दरीच्या काठवार असलेले रामलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे
इथं माकडांची संख्याही लक्षणीय आहे

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here