इंदापूर – पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला उजनी जलाशयामध्ये गस्त घालण्यासाठी स्पीड बोट (Speed Boat) दिल्यानंतर पहिल्याच दिवशी इंदापूर पोलीसांनी (Police) धडक कारवाई (Crime) करत अवैध वाळू (Illegal Sand) उपसा करणाऱ्या ४० लाख रुपयांच्या ४ फायबर बोटी व एक सक्शन बोट जिलेटीनच्या साहाय्याने उध्वस्त (Devastated) केल्या.
तहसीलदार अनिल ठोंबरे व महसूल कर्मचारी तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखालील फिरत्या गस्ती पथकाने ही थेट कारवाई केली. सलग दहा दिवसातील ही तिसरी कारवाई असून यामुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

या कारवाईत पोलीस नाईक गणेश झरेकर, पोलीस शिपाई समाधान केसकर, अमोल गारुडी, लिंगदेव नवले, सुरज कदम, शर्मा पवार, पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी भाग घेतला. इंदापूर तहसिल कार्यालयात पदभार घेण्यासाठी येणारे सिंघम तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या स्वागतासाठी ही कारवाई केल्याची चर्चा उजनी पाणलोट क्षेत्रात रंगली.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री. गोडसे म्हणाले ,जोपर्यंत उजनी जलाशयामध्ये अवैध वाळू उपसा होईल, तोपर्यंत आमची कारवाई सुरूच राहील.
Esakal