नालासोपारा: वसईतील हेफ्ट इंजिनिअरिंग कंपनीत स्फोटो होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहे. शनिवार (७ ऑगस्ट) रोजी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटाची तीव्रतेमुळे कंपनीसह शेजारील कंपनीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. (xplosion-at-vasai-heft-engineering-company)
हेफ्ट कंपनीत झालेल्या स्फोटात नेमुद्दीन मोहम्मद करीम सलमानी (वय 18) या कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, अन्वर सिद्बिकी ,विनोद यादव हे कामगार जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता जास्त असल्यामुळे शेजारील कंपनीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे संबंधित कंपनी मालकाने हेफ्ट कंपनीचे मालक सुधाकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. निष्काळजीपणा केल्याप्रकरणी हेफ्ट कंपनीच्या मालकाविरोधात भादवी 304, (आ) 287, 427 प्रमाणे वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान,मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गच्या बाजुला तुंगार फाटा येथे ही हेफ्टी कंपनी आहे. शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास हेफ्ट इंजिनिअरिंग कंपनीत बॉयलरमधील अधिक प्रेशरमुळे स्फोट झाला. या स्फोटात बाजूला असलेल्या डॉल्फिन कंपनीच्या सामाईक भिंतीला भगदाड पडलं. इतकंच नाही तर या कंपनीतील १८ वर्षीय कामगाराचाही त्यात मृत्यू झाला.
Esakal