आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना राणावत kangana ranaut नेहमीच चर्चेत असते. तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिचे व्टिटरचे अकाउंट डिलिट social media account करण्यात आले होते. मात्र त्यावरुन तिनं काही धडा घेतलेला नाही. आता तिनं आपल्या इंस्टा अकाउंटवरुन वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. सध्या जम्मु काश्मीरमधला jammu kashimir कलम 370 article 370 चा प्रश्न चर्चेत आला आहे. ते कलम त्याठिकाणी लागु करण्यात आले त्याला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे काश्मीरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं स्वागत करण्यात आलं. या घटनेवर कंगनानं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

श्रीनगरमधील shrinagar लाल चौकात lal chowk सध्या वेगळं वातावरण आहे. तिथं तिरंग्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कंगना त्यापैकी एक आहे. तिच्या त्या प्रतिक्रियेवर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहे. अनेकांनी तिला ट्रोलही केले आहे. कंगनाला अशाप्रकारे वक्तव्य करणं हे काही नवीन नाही. यापूर्वी देखील तिनं सामाजिक शांतता भंग होईल असे वक्तव्य केले आहे. काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये निवडणूका पार पडल्या त्यावर तिनं टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यामुळे व्टिटरनं तिचं अकाउंट सस्पेंड केलं होतं.

Also Read: ‘गोल्डन बॉय’ नीरजला आपल्या बायोपिकमध्ये कोण हवंय?

Also Read: ‘बेल बॉटम’मधलं पहिलं गाणं व्हायरल, खिलाडीवर कौतुकाचा वर्षाव

कंगनानं तिच्या इंस्टावरुन एक फोटो व्हायरल केलं आहे. त्यात लाल चौकातील तिरंग्याचा फोटो दिसतो आहे. तिनं आपल्या फोटोमध्ये म्हटलं आहे की, काश्मीर जसे आपले आहे तसं त्या भागातील लोकंही आपलीच आहे. माझा स्पष्ट संदेश आहे. फक्त काश्मीर नाही तर तेथील सर्व नागरिक आपले बांधव आहे. जय हिंद. कंगनाच्या त्या पोस्टला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. अनेकांनी तिला त्यावरुन ट्रोल करण्यासही सुरुवात केली आहे. मात्र कंगनानं त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here